जळगाव दि.29:- लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक
यांच्यामार्फत दि. 11 डिसेंबर 2018 ते 26 फेब्रुवारी 2019 या कालावधीत पर्यवेक्षकीय
कर्मचाऱ्यांकरीता प्रशिक्षण सत्र क्र. 19 आणि दि. 11 डिसेंबर 2018 ते 12
फेब्रुवारी 2019 या कालावधीत लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र लेखा लिपीक
प्रशिक्षण सत्र.क्र. 96 घेण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणासाठी अनुक्रमे 17 व 15 मोड्युल्सप्रमाणे निश्चित
केलेला तपशिलवार अभ्यासक्रम कोषागार अधिकारी , नाशिक, धुळे, जळगांव, अहमदनगर, नंदुरबार यांच्या कोषागार कार्यालयात
माहितीसाठी उपलब्ध आहे.
या प्रशिक्षण सत्रासाठी कोणत्याही
इच्छुक अधिकारी / कर्मचाऱ्यास प्रवेश देण्यात येईल. सदर
प्रशिक्षणासाठी संपूर्ण 60 व 50 दिवसाच्या
अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणे बंधनकारक नसून इच्छेनुसार विशिष्ट मोड्युल्सना प्रवेश
घेण्याची मुभा अधिकारी/ कर्मचारी यांना
असेल त्या अनुषंगाने नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगांव, अहमदनगर, नंदुरबार
जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयीन प्रमुखांना त्यांच्याकडील पर्यवेक्षीय अधिकारी / लिपिक वर्गीय कर्मचारी
तसेच सद्यस्थिती अधिकाऱ्यांना प्रशिक्षणासाठी
पाठवावे, असे आवाहन
लेखा व कोषागारे, नाशिक विभागाचे सहसंचालक निलेश
राजुरकर यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment