Friday, 12 October 2018

महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचा जिल्हा दौरा

     जळगाव, दि. 12 :- राज्याचे महसूल राज्यमंत्री ना. संजय राठोड हे दिनांक 17 ऑक्टोबर, 2018 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
     मंगळवार, दिनांक 16 ऑक्टोबर, 2018 रोजी सायंकाळी सात वाजुन दहा मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून विदर्भ एक्सप्रेसने चाळीसगाव, जि. जळगावकडे प्रयाण.
      बुधवार दिनांक 17 ऑक्टोबर, 2018 रोजी रात्री 00.23 मिनिटांनी चाळीसगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह, चाळीसगावकडे प्रयाण व आगमन व मुक्काम. सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी जळगाव जिल्हा बंजारा समाजातील संघटना, शिष्टमंडळ समवेत चर्चा व निवेदने स्विकारणे, स्थळ शासकीय विश्रामगृह, चाळीसगाव. सकाळी नऊ वाजता काडी कारखाना, पोतदार इंग्लिश स्कुलजवळ, चाळीसगाव येथे आयोजित कार्यक्रमासाठी प्रयाण. सकाळी नऊ वाजून 15 मिनिटांनी जळगाव जिल्हा बंजारा समाजाच्या समस्याबाबत आयोजित केलेल्या बैठकीस उपसिथती व चर्चा, स्थळ काडी कारखाना, पोतदार इंग्लिश स्कूलसमोर, जुना पाटणा रोड, चाळीसगाव, जि. जळगाव. सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटांनी तहसिल कार्यालय, चाळीसगावकडे प्रयाण. सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी तहसिल कार्यालय, चाळीसगाव येथे जिल्हाधिकारी व संबंधितांसमवेत आढावा बैठकीस उपस्थिती. सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी पत्रकार परिषद, दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी शासकीय वाहनाने कन्नड, जि. औरंगाबादकडे प्रयाण.
                                                                    00

No comments:

Post a Comment