जळगाव, दि.29:- उप प्रादेशिक
परिवहन कार्यालय, जळगाव यांच्यातर्फे जिल्हाभर मासिक दौरा आयोजित करण्यात येतो. या अंतर्गत
चाळीसगाव येथील नागरिकांची कामे वेळेवर होण्यासाठी व नागरिकांची गैरसोय होवू नये.
यासाठी बुधवार दि. 31 ऑक्टोबर 2018 रोजी
चाळीसगाव विश्रामगृह येथे अतिरिक्त मासिक दौरा (अनुज्ञप्ती) आयोजित करण्यात आला
आहे. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी एका प्रसिद्धी
पत्रकाव्दारे कळविले आहे.
०००
No comments:
Post a Comment