Friday, 26 July 2019

जिल्हयात 144 (1),(2) व (3) कलम जारी


         जळगाव.दि.26, जिल्हयात आगामी काळातील निवडणूका,सण व उत्सव लक्षात घेता प्रतिबंधात्मक कारवाई करणे आवश्यक असल्याने जळगाव जिल्हा अंतर्गत पोलीस ठाणे हद्दीतील जमिनीचे मालक,भाडेकरू,अशा कोणत्याही घराचा /मालमत्तेचा वहीवाटदार,खाजगी आणि सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण ,मंदीर,गुरूद्वारा,चर्च,मस्जीद,धर्मशाळा,हॉटेल,लॉजेस अशा वास्तुं सुरक्षित राहणे आवश्यक आहे.
        तसेच विश्वस्त, संचालक मंडळ, चालक मालक जमीनी, घर खरेदी व विक्री करणारे व्यावसायिक, जुने व नवीन चारचाकी वाहने खरेदी विक्री करणारे व्यावसायिक, फेरीवाले, सिमकार्ड विक्रेते, सायबर कॅफे, भंगार विक्री खरेदी  करणारे व्यावसायिक आद्योगिक वसाहतींना मनुष्यबळ पुरविणाऱ्या एजन्सी, ज्वलनशिल, ज्वालाग्राही पदार्थांचे साठेधारक, शस्त्र व दारुगोळा परवाना धारक इत्यादि जळगाव जिल्हा पोलिस ठाणे कार्यक्षेत्रात येणारे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना अशा मालमत्ते बाबतची व्यवहार /विवरणाची माहिती लेखी स्वरूपात देणे बंधनकारक आहे.
            तसेच सर्व संबंधितांना नोटीस देवून त्यांचे म्हणणे ऐकून घेणे सद्य:स्थितीत शक्य नसल्याने एकतर्फी आदेश काढण्यात येत आहेत. तरी अशा परिस्थितीत जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून प्रकीया संहिता 1973 चे कलम 144 (1) (12) व (3) दिनांक 15 जुलै पासून पुढील 60 दिवसांपावेतो संपूर्ण जिल्हा हद्दीत लागू जारी करण्यात येत आहे. जिल्हयातील नागरिकांनी जिल्हयात शांतता अबाधित राहण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हादंडाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                    00000

No comments:

Post a Comment