जळगाव, दिनांक 25 -
नाविण्यपूर्ण राज्यस्तरीय योजनांतर्गत सन 2019-20 या वर्षासाठी खालील योजनांकरिता
ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
दुधाळ संकरीत गायी/म्हशीचे
गट, अशंत: ठाणबध्द पध्दतीने संगोपन करण्यासाठी 10 शेळया अ 1 बोकड/10 मेंढ्या नर मेंढा,
1000 मांसल कुक्कुट पक्षी संगोपनासाठी
योजना आहे.
नाविण्यपूर्ण योजने अंतर्गत
सर्वसाधारण/ अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती या याप्रवर्गातील 18 वर्षावरील
अर्जदारांकडून 25 जुलै ते 8 ऑगस्ट 2019 या
कालावधीतऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येंत आहेत. योजनेची पुर्ण माहिती व अर्ज
करण्याची कार्यपध्दती याबाबतचा संपूर्ण तपशील https://ah.mahabms.com या
संकेतस्थळावर व गुगल प्ले स्टोअर वरील ( AH MAHABMS) या मोबाईल ॲपवर उपलब्ध आहे.
अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारले जातील, याची नोंद घ्यावी. तरी इच्छुक
अर्जदारांनी वर नमूद विहित कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत.
अर्ज भरतांना अर्जदाराने
नोंदविलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत एसएमएस व्दारे संदेश
पाठविण्यांत येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराने आपला भ्रमणध्वनी
क्रमांक योजनेतंर्गत अंतिम निवड होईपर्यत बदलू नये.
अर्जदाराची प्राथमिक निवड
अर्जदाराने ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या माहितीनुसार संगणकाव्दारे करण्यात येणार
असली तरी अंतिम निवड ही त्याने अपलोड केलेल्या कागदपत्रांच्या आधारेच करण्यांत
येईल. याची नोंद घ्यावी. योजनेबाबत अधिक माहितीसाठी तालुक्याचे ठिकाणी
पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती यांचेशी संपर्क साधावा, अथवा जिल्हा
पशुसंवर्धन उपआयुक्त, जळगांव यांचेशी संपर्क साधावा.
0 0 0 0 0
No comments:
Post a Comment