Friday, 13 December 2019

तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे 16 डिसेंबर रोजी तहसिल कार्यालयात आयोजन


             जळगाव, दि.13- महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या 26 सप्टेंबर, 2012 रोजीच्या परिपत्रकानुसार  महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्याबाबत सूचना जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
            त्यानुसार माहे डिसेंबर 2019 चा जळगाव तालुक्याचा तालुकास्तरीय लोकशाही दिन तहसिल कार्यालय, जळगाव येथे सोमवार, 16 डिसेंबर, 2019 रोजी सकाळी 11.00 वाजता आयोजित केलेला आहे.
            तरी जळगाव तालुक्यातील नागरिकांनी व तालुक्यातील संबंधित यंत्रणेनी याची नोंद घ्यावी. असे आवाहन तहसिलदार वैशाली हिंगे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
                                                                         00000

No comments:

Post a Comment