जळगाव, दि. 12 :-
प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिन घेणेबाबत
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या 26 सप्टेंबर, 2012 च्या
परिपत्रकानुसार राज्यातील सर्व तहसिलदारांना सूचित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने
जळगाव जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालयांमध्ये तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन
करण्यात आले आहे. त्यानुसार माहे डिसेंबर 2019 चा तालुकास्तरीय लोकशाही दिन 16
डिसेंबर, 2019 रोजी प्रत्येक तहसील कार्यालयात आयोजित करण्यात येणार असल्याची
माहिती निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम यांनी दिली आहे.
जिल्हास्तरीय
सर्व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी तालुकास्तरीय लोकशाही दिनास उपस्थित राहून आपल्या
खात्यासंबंधी नागरिकांकडून प्राप्त होणा-या तक्रारी आपल्यास्तरावरच निकाली
काढव्यात. जेणेकरून तालुकास्तरीय समस्या, तक्रारी ह्या तालुक्यातच सुटून
तक्रारदारांना त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर यावे लागणार
नाही.
तसेच
नागरिकांनीही आपल्या वैयक्तिक हितसंबंधाबाबतच्या तक्रारी घेवून तालुकास्तरीय
लोकशाही दिनी आपल्या तालुक्याच्या तहसिल
कार्यालयात उपस्थित राहून तक्रारी दाखल कराव्यात, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी
वामन कदम यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
000
No comments:
Post a Comment