Tuesday, 10 December 2019

रावेरचा आठवडे बाजार शुक्रवार ऐवजी बुधवारी भरणार - जिल्हादंडाधिकारी डॉ.नंदकुमार बेडसे


जळगाव, दि. 10 - रावेर नगरपालिका हद्दीत दर शुक्रवारी आठवडे बाजार भरविण्यात येतो. तथापि, शुक्रवार, 13 डिसेंबर रोजी श्री. दत्तजयंती निमित्ताने रथयात्रा असून सदर रथ गावांत मिरवणुकीद्वारे फिरवला जात असल्याने शुक्रवार, 13 डिसेंबर रोजी भरणारा आठवडे बाजार हा कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने बुधवार, दि. 11 डिसेंबर, 2019 रोजी भरवावा.  अशी विनंती मुख्याधिकारी, रावेर यांनी केली आहे.
त्यानुसार रावेर नगरपालिका हद्दीत भरविण्यात येणारा शुक्रवार‍ दि. 13 डिसेंबर रोजीचा आठवडे बाजार हा बुधवार, दि. 11 डिसेंबर रोजी भरविण्यात यावा. असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिले आहे.
                                                                     000

No comments:

Post a Comment