Tuesday, 17 December 2019

ग्राहक जागृती अभियानातंर्गत आज लेवा भवनात प्रदर्शनाचे आयोजन


जळगाव, दि. 17 - दरवर्षी 24 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने ग्राहक जागृती अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून 18 डिसेंबर, 2019 रोजी दुपारी 1 ते 3  वाजेदरम्यान  सरदार वल्लभभाई पटेल, लेवा भवन जिल्हा पेठ, जळगाव येथे ग्राहक जागृतीपर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
 या प्रदर्शनास जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्राहकांनी भेट द्यावी. असे आवाहन रा.भा.बांगर, सहायक नियंत्रक, वैधमापनशास्त्र, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
000

No comments:

Post a Comment