Wednesday, 11 December 2019

जळगाव येथे 30 डिसेंबर रोजी डाक अदालतीचे आयोजन

             जळगाव, दि. 11 - चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करीत असताना काही त्रुटींमुळे पोस्टाच्या सेवेबद्दल लोकांना तक्रार करण्याची वेळ येते. ह्या तक्रारींचा योग्यप्रकारे न्याय निवाडा करण्यासाठी पोस्ट खाते वेळोवेळी डाक अदातीचे आयोजन करीत असते. त्यामध्ये पोस्टाचे अधिकारी तक्रारदारांना प्रत्यक्षपणे भेटतात त्यांच्या तक्रारीची दखल घेवून त्या लवकरात लवकर सोडविण्याचा प्रयत्न करतात.
           लोकांना न्याय देता यावा आणि त्यांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण व्हावे, याउद्देशाने 30 डिसेंबर, 2019 रोजी दुपारी 4.00 वाजता डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार दोन प्रतीत अधिक्षक डाकघर कार्यालय, 1 ला माळा, हेड पोस्ट ऑफिस बिल्डिंग, जळगाव यांच्या नावे अतिरिक्त प्रतींसह 23 डिसेंबर, 2019 पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहचेल अशा बेताने पाठवावी. असे अधिक्षक डाकघर जळगाव विभाग, जळगाव यांनी एका प्रसध्दिी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                   000

No comments:

Post a Comment