जळगाव.दि.16, कौशल्य विकास , रोजगार व
उद्योजकता विभाग ,जळगाव मार्फत जिल्ह्यातील
अल्पसंख्यांक उमेदवारांसाठी इकरा सोसायटी
संचलित खाजगी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (खाजगी आयटीआय), एच.पी.पेट्रोल
पंपामागे, नॅशनल हायवे क्रमांक 6 मेहरूण ,जळगाव येथे 18 डिसेंबर 2019 रोजी सकाळी
11.00 वाजता मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मेळाव्यास मुद्रा बँक योजना, रोजगार व स्वयंरोजगाराच्या
संधी अल्पंसख्यांक उमेदवारांसाठी कर्ज योजना, कौशल्य विकास कार्यक्रम इत्यादिबाबत
मार्गदर्शन / तज्ञ उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी अल्पसंख्यांक
उमेदवारांनी जास्तीत-जास्त संख्येने उपस्थित राहून रोजगाराविषयी तज्ञ
मार्गदर्शकांचे मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा
असे आवाहन, सहाय्यक संचालक,कौशल्य विकास ,रोजगार व उद्योजकता, जळगाव यांनी एका
प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
*****
No comments:
Post a Comment