Friday, 13 December 2019

जिल्हास्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिनाचे 24 डिसेंबर रोजी चोपडा येथे आयोजन


            जळगाव, दि.13 - नागरिकांना आपल्या ग्राहक हक्काची जाणीव व्हावी व ग्राहक चळवळ अधिकाधिक लोकाभिमूख व्हावी. याउद्देशाने दर वर्षी 24 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून पाळण्यात येतो. या वर्षीचा जिल्हास्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिन चोपडा नगरपालिका सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
            तरी नागरिकांनी ग्राहक म्हणून आपल्याला असलेले अधिकार व ग्राहक म्हणून वावरताना घ्यावयाची सतर्कता यावर मान्यवरांचे मार्गदर्शनाचा लाभणार आहे. यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
00000

No comments:

Post a Comment