जळगाव, दि. 31 - जनतेच्या तक्रारी व गाऱ्हाणी सोडविण्यासाठी दर महिन्याच्या
पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार सन 2020 या वर्षातील
पहिला लोकशाही दिन सोमवार दि. 6 जानेवारी,
2020 रोजी आयोजित करण्यात आला आहे.
जिल्हास्तरीय लोकशाही दिनात
अर्ज सादर करू इच्छिणाऱ्या अर्जदारांनी न्यायप्रविष्ठ प्रकरणे वगळून आपले तक्रार
अर्ज सोमवार, दिनांक 6 जानेवारी, 2020 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत नियोजन भवन, जिल्हाधिकारी
कार्यालय आवार, जळगाव येथे आयोजित लोकशाही दिनात सादर करावेत. असे आवाहन निवासी
उपजिल्हाधिकारी वामन कदम यांनी एका
प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
000
No comments:
Post a Comment