Friday, 13 December 2019

ग्रामिण भागातील महिलांसाठी 23 डिसेंबर रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन


            जळगाव, दि.13 - ग्रामीण भागातील महिलांच्या तक्रारी व ग्राहाणी सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी तालुकास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. माहे डिसेंबर 2019 च्या महिला लोकशाही दिनाचे 23 डिसेंबर, 2019 रोजी तहसिल कार्यालय, जळगाव येथे आयोजन करण्यात आले आहे.
            तरी ग्रामीण भागातील महिलांनी या लोकशाही दिनात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होवून लोकशाही दिनाचा लाभ घ्यावा. असे आवाहन सदस्य सचिव महिला लोकशाही दिन तथा बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, जळगाव (ग्रामीण भाग) यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
00000

No comments:

Post a Comment