Friday, 26 February 2021

संत रविदास महाराज जयंतीनिमित जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिमापूजन

 

        जळगाव, (जिमाका) दि. 27 – संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिमापूजन करुन संत रविदास महाराजांना अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.

        याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, अव्वल कारकुन आर. एस. पाटील यांचेसह अन्य अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००००

पिडीतांच्या कुटूंबियांना न्याय मिळवून देवू राष्ट्रीय अनूसूचीत आयोगाचे सदस्य : सुभाष पारधी कुटूंबियांना मदतीचे धनादेश वितरीत

       जळगाव, दि. 26 (जिमाका वृत्तसेवा) :  जळगाव जिल्ह्यात दोन ठिकाणी यूवतींवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. राष्ट्रीय अनूसुचीत आयेागाचा सदस्य झाल्यानंतर लागलीच हा दौरा केला आहे. त्या यूवतींच्या कुटूंबियांची भेट घेवून त्यांना धीर देत न्याय मिळवून देण्याचे आश्‍वासन आज दिले आहे. सोबतच त्यांना आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वितरणही आज झाले असल्याची माहिती राष्ट्रीय अनूसूचीत आयोगाचे सदस्य सुभाष पारधी (नवी दिल्ली) आज येथील अजिंठा विश्रामगृहात झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिली.

            या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, अनूसुचीत आयोग कार्यालयाच्या सहाययक निदेशक आनुराधा दुसाने (पुणे), समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील आदि उपस्थित होते.

             मालदाभाडी (ता.जामनेर) येथे अत्याचारग्रस्त पिडीतेने गळफास घेवून आत्महत्या केली होती. आज तिच्या कुटूंबियांची भेट घेतली. त्यांना शासनातर्फे मदतीचा 4 लाख 12 हजार 500 चा धनादेश दिला. संशयितांवर कारवाईबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी  चर्चा केली आहे.

            उचंदा (ता.मुक्ताईनगर) येथे मध्यप्रदेशातील यूवती काकाच्या लग्नाला आली होती. तिच्यावर अत्याचार करणाऱ्यास अटक करण्यात आली आहे. तिच्या कुटूंबियांचीही आज भेट घेवून शासनाच्या मदतीचा दोन लाखांचा धनादेश देण्यात आला आहे.

            यासोबतच लोणी (ता.पारोळा), चोपडा तालुक्यातील काही घटनांत अत्याचार झाल्याची तक्रार केली आहे. त्याबाबत पोलिसांना योग्य ती कारवाईचे आदेश दिले आहेत. काही पिडीतांचे, कुटूंबियांचे पुनवर्सन करण्यासाठी त्यांना घरकुल योजनेसह इतर योजनांचा लाभ मिळवून देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आल्याचेही त्यांनी बैठकीत सांगितले.

00000

Thursday, 25 February 2021

जिल्ह्यात अनाथ सापडलेल्या दोन बालकांच्या पालकांना आवाहन

             जळगाव, दि. 25 (जिमाका वृत्तसेवा) : रावेर शहरातील जुन्या शासकीय इस्पितळाच्या मागील बाजूस असलेल्या काटेरी झुडपांमध्ये 30 डिसेंबर 2020 रोजी एक दिवसाचे बालक आढळून आले होते. रावेर पोलिसांनी त्याला प्रथमोपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तसेच ही माहिती अध्यक्ष, बालकल्याण समिती, जळगाव यांना कळविली होती. या बालकास भारतीय समाज सेवा केंद्र, औरंगाबाद येथे दाखल करण्यात आले असून त्याचे नामकरण अमर असे करण्यात आले आहे. तसेच

             डांभुर्णी शिवारात  चोपडा  रोडवरील निलांस फॅक्टरी जवळील शेतात निराधार अवस्थेत 21 डिसेंबर 2020 रोजी बालक आढळून आला आहे. यावल पोलिसांनी त्याला प्रथमोपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्याचे नामकरण अवनीश असे करण्यात आले. त्याला बाल कल्याण समिती औरंगाबाद येथे दाखल करण्यात आले आहे. सध्या अवनीश भारतीय समाज सेवा केंद्र औरंगाबाद या संस्थेत आहे. या दोन्ही बालकांचे पालक व नातेवाईकांनी  30 दिवसांच्या आत पुढील पत्याल्वर संपर्क साधावा : पत्ते असे : भारतीय समाज सेवा केंद्र, अनिकेतन, प्लॉट क्रमांक  151, सर्वे क्रमांक 15, बी. एस. जी. एम. शाळेसमोर, गुरुसहानी नगर, एन/4 सिडको औरंगाबाद, दूरध्वनी क्र. 0240-2453922,  मा. अध्यक्ष, बाल कल्याण समिती, द्वारा : शासकीय मुलांचे निरीक्षण गृह, एन-12, ताज हॉटेलच्या मागे, हडको, औरंगाबाद , दूरध्वनी क्र. 0240-2381473, मा. अध्यक्ष, बाल कल्याण समिती, जिल्हाधिकारी कार्यालय रस्ता, जिल्हा पेठ, जळगाव, दूरध्वनी क्रमांक : 0257 - 2239550,  पोलिस निरीक्षक, यावल पोलिस स्टेशन, यावल जि. जळगाव- दूरध्वनी क्र. 02585-261333.

00000

बीटीआरआय गुणपत्रकासाठी विद्यार्थ्यांना आवाहन

             जळगाव, दि. 24  (जिमाका वृत्तसेवा) :  बीटीआरआय परीक्षेतील प्रमाणपत्रासाठी परीक्षा उत्तीर्ण परंतु, अद्याप अंतिम प्रमाणपत्र न मिळालेल्या उमेदवारांनी बीटीआरआय उत्तीर्ण गुणपत्रक, Offline Contract Form, Bank Statement (प्रशिक्षणार्थ्यांना मिळालेल्या Stipend  ची नोंद असावी) सात दिवसांत सादर करावीत. जेणेकरून अंतिम प्रमाणपत्र मिळणे शक्य होईल, असे अंशकालीन प्राचार्य, मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषगिक सूचना केंद्र व्दारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या  पत्रकान्वये कळविले आहे.

00000

जळगाव जिल्ह्यात 10 एप्रिल रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

             जळगाव, दि. 25 (जिमाका वृत्तसेवा) :  प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी आणि सामोपचाराने तडजोड घडवून वाद मिटविण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा वकील संघातर्फे जळगाव जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये 10 एप्रिल, 2021 या एकाच दिवशी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

            जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात लोकअदालत होईल. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी अध्यक्षस्थानी असतील. जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, महानगरपालिका आयुक्त, जिल्हा वकील संघाचे पदाधिकारी आदींचे सहकार्य लाभणार आहे.

            या लोकअदालतमध्ये मोटार वाहन वाहतूक चलन, भूसंपादन, धनादेश अनादर, वैवाहिक खटले, मोटार अपघात खटले, म्युनिसीपल अपील, दिवाणी व फौजदारी प्रकरणे, न्यायालयात प्रलंबित इतर खटले, व खटले दाखलपूर्व प्रकरणे तसेच ज्या खटल्यांमध्ये कायद्याने तडजोड करता येणे शक्य आहे, असे खटले तडजोडीने निकाली काढण्यात येतील. याशिवाय राष्ट्रीयकृत बँका, कंपनी, मोबाईल कंपनी, दूरध्वनी कार्यालयांनी थकीत रकमेमध्ये सूट देण्याबाबत प्रस्तावित केलेले आहे. औद्योगिक, कामगार, सहकार न्यायालय तसेच ग्राहक तक्रार निवारण मंचकडील तडजोड योग्य प्रकरणेदेखील लोकअदालतीत सादर करण्यात येणार आहेत.

                                                                               00000

राष्ट्रीय अनुसूचित आयोग, नवी दिल्लीचे सदस्य सुभाष पारधी शुक्रवारी जळगाव जिल्हा दौऱ्यावर

             जळगाव,(जिमाका) दि. 25 - राष्ट्रीय अनुसूचित आयोग, नवी दिल्लीचे सदस्य सुभाष पारधी हे शुक्रवार दि. 26 फेब्रुवारी, 2021 रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम  पुढीलप्रमाणे.

            शुक्रवार दि. 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 5.53 मिनिटांनी जळगाव रेल्वे स्थानकावर राजधानी एक्सप्रेसने आगमन. सकाळी 6.00 वाजता मोटारीने अजिंठा विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 10.00 वाजता जामनेर येथील पीडित कुटुंबांशी  व पोलीस अधिकारी यांचेशी चर्चा (FIR NO 38/2021). दुपारी 12.00 वाजता मुक्ताईनगर येथील पीडित कुटुंबीय व पोलीस अधिकारी यांचेशी चर्चा (FRI NO.0062/2021) दुपारी 2.00 वाजता जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक. स्थळ- अजिंठा शासकीय विश्रामगृह. दुपारी 3.00 वाजता पत्रकार परिषद, अजिंठा शासकीय विश्रामगृह. रात्री 21.50 वाजता 02169 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई नागपूर एक्सप्रेसने नागपूरकडे प्रयाण.

0000

 

Wednesday, 24 February 2021

जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज, आज वेबिनारद्वारे मोफत मार्गदर्शन वर्ग

             जळगाव, दि. 24  (जिमाका वृत्तसेवा) : जात वैधता प्रमाणपत्राकरीता ऑनलाइन अर्ज करण्यासंदर्भात मोफत वेबिनारचे 25 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 1.00 वाजता आयोजन करण्यात आले आहे, असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगावचे उपायुक्त वैशाली हिंगे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

            आवश्यक दस्ताऐवज स्कॅन करुन अपलोड करणे व त्यानंतर अर्ज ऑनलाईन सबमिट करणे आवश्यक आहे. या पुर्तता केल्यानंतर अर्जाची प्रिंट काढुन विहीत मार्गाने पुर्वीप्रमाणेच सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत या समितीस अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. मा. महासंचालक डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुर्ण यांचे निर्देशानुसार या प्रक्रियेची सर्वसामान्य नागरीक व अर्जदारांना माहीती व्हावी या दृष्टीकोनातुन वार गुरुवार दिनांक 25  फेब्रुवारी, 2021 रोजी दुपारी 1.00 वाजता  वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या वेबिनारची zoom meeting ID ८३८७०९३५०४३   Passcode- yyyiid२१२० अशी लिंक आहे. या वेबिनार मध्ये सहभाग घेण्यास इच्छुक असलेल्या नागरीकांनी zoom App  डाऊनलोड करुन त्याव्दारे वेबिनारमध्ये  जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन उपायुक्त श्रीमती हिंगे  यांनी केले आहे.

०००००

ब्रेक टेस्ट ट्रॅकवर होणार उमेदवारांची चाचणी

             जळगाव, दि. 24 (जिमाका वृत्तसेवा) : जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा (कोविड -19) प्रादुर्भाव वाढत आहे. बाधित रुग्णाच्या संख्येत वाढ होत असल्याने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथील पक्क्या अनुज्ञप्तीसाठी येणाऱ्या उमेदवारांची चाचणी या कार्यालयाच्या मोहाडी  परिसरातील  ब्रेक  टेस्ट  ट्रॅकवर घेण्यात येईल. नवीन वाहन नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या  वाहनाची  तपासणी  संबंधित वाहन वितरकाच्या शोरुममध्ये होईल. नागरिकांनी नोंद घेवून सहकार्य करावे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी  तथा प्रभारी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, महेश देशमुख जळगाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

00000

महाडीबीटी पोर्टलवर विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करावेत

 जळगाव, दि. 24  (जिमाका वृत्तसेवा) : जळगाव जिल्ह्यातील शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज  महाडीबीटी पोर्टलवर सादर करावेत, असे समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

सर्व शासन मान्यता प्राप्त अनुदानित,  विना अनुदानित, कायम विनाअनुदानित व्यावसायिक व अव्यावसायिक महाविद्यालयांचे प्राचार्य व महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी 2020- 2021 या वर्षासाठी अर्ज महाडीबीटी प्रणालीवर सादर करण्यासाठी केंद्र सरकार शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजनेचे अर्ज भरण्यासाठी महाडीबीटी ही संगणक प्रणाली 3 डिसेंबर 2020 पासून कार्यान्वित केली आहे.

सन 2020- 2021 मध्ये प्रवेशित मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्तीचे अर्ज तत्काळ महाडीबीटी प्रणालीवर सादर करावेत. संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, राजर्षि शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न असलेल्या विद्यार्थ्यांनी निर्वाह भत्ता या योजनेचे अर्ज तत्काळ भरावेत. महाविद्यालयाचे लिपिक व प्राचार्यांनी अर्जांची पडताळणी करुन या कार्यालयास विहित वेळेत ऑनलाईन सादर करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

जळगाव तहसील कार्यालयात सोमवारी ऑनलाइन लोकशाही दिन

             जळगाव, दि. 24 (जिमाका वृत्तसेवा) – नागरिकांच्या तक्रारी, गाऱ्हाणी सोडविण्यासाठी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने घोषित केलेल्या लॉकडाऊन कालावधीमध्ये तालुका/जिल्हाधिकारी/महानगरपालिका व विभागीय आयुक्तस्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन दूरचित्रवाणी परिषदेव्दारे (video Conferancing) करणेबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत.  त्यानुसार सोमवार 1 मार्च, 2021 रोजी  संबंधित तहसील कार्यालय येथे तालुका स्तरावरील लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे. सर्व संबंधितांनी तालुका स्तरावरील लोकशाही दिनाचा लाभ घ्यावा. असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

00000

जिल्हाधिकारी कार्यालयात 1 मार्च रोजी लोकशाही दिन ऑनलाइन होणार

             जळगाव, दि. 24 (जिमाका वृत्तसेवा) : नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी दरमहा पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. सद्य:स्थितीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. या  विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने घोषित केलेल्या लॉकडाऊन कालावधीत तालुका, जिल्हाधिकारी, महानगरपालिका व विभागीयस्तरावर लोकशाही दिन दूरचित्रवाणी परिषदेव्दारे (video Conferancing) आयोजित करावेत, असे निर्देश दिले आहेत. त्यानुसार 1 मार्च, 2021 रोजी सकाळी 11 वाजता दूरचित्रवाणी परिषदेव्दारे (Video Conferancing) लोकशाही दिन होईल. या दिवशी लोकशाही दिनातील प्रलंबित प्रकरणांबाबत आढावा बैठक देखील होईल. जिल्ह्यातील संबंधित विभाग प्रमुखांनी आपल्या अधिपत्याखालील विभागांचा प्रलंबिंत प्रकरणांचा आढावा घेऊन व त्याबाबतचा निपटारा करुन  या दिवशी आवश्यक त्या अहवालासह सकाळी 11 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

                                                                    00000

Tuesday, 23 February 2021

संत गाडगेबाबा महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिमापूजन

 

       जळगाव (जिमाका) दि.23 - थोर समाज सुधारक संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिमापूजन करुन संत गाडगे बाबाना अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.

            याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, तहसिलदार सुरेश थोरात, पंकज लोखंडे यांचेसह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

00000

Monday, 22 February 2021

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक कार्यवाहीचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आदेश

 

             जळगाव, दि. 22 (जिमाका) :- कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी तत्काळ कठोर कार्यवाहीचे आदेश आज जिल्हाधिकारी श्री. अभिजीत राऊत यांनी सहकार, परिवहन, अन्न व औषध प्रशासन आणि रेल्वे विभागास दिले.

            जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रभाव नियंत्रणात आणण्यासाठी करावयाच्या उपाययोजना संदर्भात जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी या विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठक घेतली. या बैठकीस जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवाई, उप प्रादेशिक परिवहन  विभागाचे महेश देशमुख, अन्न व औषध प्रशासन विभागाचे वाय के बेंडकुळे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाचे  प्रतिनिधी ए. के पाठक, महानगर पालिकेच्या अप्पर आयुक्त विद्या गायकवाड, डॉ. राम रावलाणी आदी उपस्थित होते.

            श्री राऊत म्हणाले की  बाजार समितीमध्ये सकाळी घाऊक खरेदीदाराबरोबरच किरकोळ खरेदीदार गर्दी करतात ती रोखण्यासाठी सहकार विभागाने कडक कार्यवाही करावी तसेच परिवहन विभागाने विनामास्क प्रवाशी आढळल्यास कार्यवाही करावी.  एस. टी. महामंडळाच्या तसेच खाजगी बस, रिक्षांमधून जादा प्रवासी प्रवास करतात. अनेक प्रवाशी मास्क न लावता प्रवास करतात त्यांच्यावर कडक कारवाई करावी, रेल्वे विभागाने अमरावती, अकोला, मुंबई,  पुणे व नागपूर या जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांची माहिती उपलब्ध करुन द्यावी. तसेच रेल्वे गाडीतून प्रवास करतांना सोशल डिस्टन्सींग पाळले जात आहे की एकाच ठिकाणी गर्दी  करुन प्रवासी प्रवास करीत आहे हे तपासावे, अन्न व औषध विभागाने गर्दी  होणाऱ्या उपहारगृहात तपासणी करावी, गर्दी होणारे ढाब्यांवर तपासणी करावी.  ग्राहकांना समोरासमोर न बसविता एक दिशेने बसवून सोशल डिस्टन्सींग पाळावे. यावेळी जळगाव महापालीकेने तपासणी केलेल्या कार्यवाहीची माहिती अप्पर आयुक्त विद्या गायकवाड यांनी बैठकीत दिली.यात 377 विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली, 14 मंगल कार्यालये, 15 खाजगी क्लासेसवर ही कार्यवाही करण्यात आल्याची माहिती त्यांनी बैठकीत दिली. डॉ. रावलाणी यांनी आरोग्य विषयक केलेल्या तयारीची माहिती दिली.

००००