Thursday, 25 February 2021

जिल्ह्यात अनाथ सापडलेल्या दोन बालकांच्या पालकांना आवाहन

             जळगाव, दि. 25 (जिमाका वृत्तसेवा) : रावेर शहरातील जुन्या शासकीय इस्पितळाच्या मागील बाजूस असलेल्या काटेरी झुडपांमध्ये 30 डिसेंबर 2020 रोजी एक दिवसाचे बालक आढळून आले होते. रावेर पोलिसांनी त्याला प्रथमोपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तसेच ही माहिती अध्यक्ष, बालकल्याण समिती, जळगाव यांना कळविली होती. या बालकास भारतीय समाज सेवा केंद्र, औरंगाबाद येथे दाखल करण्यात आले असून त्याचे नामकरण अमर असे करण्यात आले आहे. तसेच

             डांभुर्णी शिवारात  चोपडा  रोडवरील निलांस फॅक्टरी जवळील शेतात निराधार अवस्थेत 21 डिसेंबर 2020 रोजी बालक आढळून आला आहे. यावल पोलिसांनी त्याला प्रथमोपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्याचे नामकरण अवनीश असे करण्यात आले. त्याला बाल कल्याण समिती औरंगाबाद येथे दाखल करण्यात आले आहे. सध्या अवनीश भारतीय समाज सेवा केंद्र औरंगाबाद या संस्थेत आहे. या दोन्ही बालकांचे पालक व नातेवाईकांनी  30 दिवसांच्या आत पुढील पत्याल्वर संपर्क साधावा : पत्ते असे : भारतीय समाज सेवा केंद्र, अनिकेतन, प्लॉट क्रमांक  151, सर्वे क्रमांक 15, बी. एस. जी. एम. शाळेसमोर, गुरुसहानी नगर, एन/4 सिडको औरंगाबाद, दूरध्वनी क्र. 0240-2453922,  मा. अध्यक्ष, बाल कल्याण समिती, द्वारा : शासकीय मुलांचे निरीक्षण गृह, एन-12, ताज हॉटेलच्या मागे, हडको, औरंगाबाद , दूरध्वनी क्र. 0240-2381473, मा. अध्यक्ष, बाल कल्याण समिती, जिल्हाधिकारी कार्यालय रस्ता, जिल्हा पेठ, जळगाव, दूरध्वनी क्रमांक : 0257 - 2239550,  पोलिस निरीक्षक, यावल पोलिस स्टेशन, यावल जि. जळगाव- दूरध्वनी क्र. 02585-261333.

00000

No comments:

Post a Comment