Friday, 12 February 2021

जिल्हास्तरीय युवा पुरस्कारासाठी 25 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

             जळगाव, (जिमाका) दि. 12 - जिल्हयातील युवांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरवा व्हावा. व त्यांना युवा विकासाचे कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी शासनामार्फत जिल्हास्तरावर एक युवक, एक युवती, एक नोंदणीकृत संस्था यांना युवा पुरस्कार प्रतिवर्षी शासनामार्फत देण्यात येतो.

            जिल्हास्तर युवा पुरस्काराकरिता जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, जळगाव मार्फत सन 2018-19,  सन 2019-20 व सन 2020-21 या तीन वर्षाच्या पुरस्काराकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. जिल्हा युवा पुरस्कार हा जिल्हास्तरावर एक युवक व एक युवती तसेच एक नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येईल. सदर पुरस्काराचे अर्ज विहित नमुन्यात भरुन केलेल्या कामाचे योग्य ते सबळ पुरावे (वृत्तपत्र करणे, प्रशस्तीपत्र, चित्रफिती व फोटो इत्यादी) जोडून सादर करावायाचा आहे.

            पुरस्काराकरिता प्रस्ताव प्रथम ऑनलाईन सादर करावयाचा आहे. त्यानंतर प्रस्तावाची एक प्रत कार्यालयात जमा करावयाची आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता Jalgaonsports.in या लिंकवर माहिती भरावी. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दिनांक 25 फेब्रुवारी, 2021 पर्यंत आहे. अर्जदाराने प्रस्तावाची हार्ड कॉपी कार्यालयात जमा करण्याची अंतिम मुदत दिनांक 26 फेब्रुवारी, 2021 आहे. कार्यालयाचा पत्ता व संपर्क नंबर - जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव, ए. विंग श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, स्टेट बॅके समोर, जळगाव. दूरध्वनी क्रमांक 0257-2237080/ 9421693471 वर संपर्क साधावा.

            अर्जदार युवक/युवतीचे वय पुरस्कार वर्षातील 1 एप्रिल रोजी 13 वर्ष पूर्ण व 31 मार्च रोजी 35 वर्ष पर्यत असावे. सदर वरील दोन्ही पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या युवक, युवती  व युवा विकासाचे कार्य करणाऱ्या संस्थांनी केलेली कार्य हे दिनांक 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत गत तीन  वर्षाची केलेली कामगिरी विचारात घेतली जाईल. जिल्हा युवा पुरस्काराचे विहीत नमुन्यातील अर्ज वरील वेबसाईटवरही उपलब्ध आहेत. तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातही उपलब्ध होणार आहे.

            पुरस्कारासंबंधी अधिक माहिती क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या संकेतस्थळ http://sports.maharashtra.gov.in वरही उपलब्ध आहे.        सन 2018-19, सन 2019-20 व सन 2020-21 या तीन वर्षातील दिलेल्या विहित मुदतीप्रमाणे प्रस्ताव अर्जदाराने jalgaonsports.in या वेबसाईटवर जावुन अर्ज ऑनलाईन भरुन संबंधित सर्व कागदपत्रे अपलोड करावे. त्यानंतरच अर्जाची हार्ड कॉपी कार्यालयात जमा करावी. कार्यालयास विहित मुदतीत प्रस्तावाची हार्डकॉपी जमा केल्यानंतरच आपला प्रस्ताव पुरस्काराकरिता ग्राहय धरण्यात येईल. आपण प्रस्तावासोबत जोडलेल्या कार्याची पीपीटी ही तयार करावी. अर्जदार यांची मुलाखत व पीपीटी सादरीकरण व त्यांचे प्रस्तावातील कागदपत्र यांच्या अनुषंगाने पुरस्कारार्थीची निवड जिल्हा युवा पुरस्कार निवड समिती मार्फत करण्यात येणार आहे. असे जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. 

00000

No comments:

Post a Comment