Thursday, 18 February 2021

मतदार यादीसाठी 27 फेब्रुवारीपर्यंत छायाचित्र जमा करण्याचे आवाहन

             जळगाव, (जिमाका) दि. 18 - जळगाव शहर मतदार संघाची अंतिम मतदार यादी दिनांक 15 जानेवारी, 2021 रोजी प्रसिद्ध झाली आहे. जळगाव शहर मतदार यादीत नाव आहे, परंतु छायाचित्र नाही असे एकूण 3804 मतदार आहेत. या मतदारांना बीएलओ यांनी वेळोवेळी संपर्क साधूनही त्यांनी अद्याप फोटो जमा केलेले नाहीत.

            अशा मतदारांना अंतीमरीत्या सूचित करण्यात येते की, मतदार यादीत आपले नाव व फोटो आहे किंवा नाही याबाबत खातरजमा करण्यासाठी www.jalgaon.gov.in या संकेतस्थळावर आपले नावाची खात्री करुन 27 फेब्रुवारी, 2021 पावेतो आपले फोटो BLO यांचेकडे अथवा तहसील कार्यालयात जमा करावे.

            ज्या मतदारांचे फोटो प्राप्त होणार नाहीत, अशी नावे कटाक्षाणे वगळली जाणार आहेत. नाव वगळले गेल्यास पुनश्च: फॉर्म नं. 6 भरुन नाव नोंदणी करता येईल. असे मतदार नोंदणी अधिकारी, 13 जळगाव शहर विधानसभा मतदार संघ, तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, जळगाव भाग, जळगाव यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                           00000

No comments:

Post a Comment