जळगाव (जिमाका) दि. 15 - उप विभागीय अधिकारी कार्यालय, एरंडोल येथील एक नायब तहसीलदार व दोन लिपिकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अशी माहिती प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी दिली आहे.
त्यामुळे मागील 8 दिवसात उप विभागीय अधिकारी, एरंडोल कार्यालयास भेट दिलेले आणि 20 मिनीटांपेक्षा अधिक वेळ कार्यालयात थांबलेल्या नागरिकांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.
तसेच कार्यालयात येतान मास्क लावूनच यावे. आल्यानंतर सामाजिक अंतराचे पालन करावे, असे आवाहनही श्री. गोसावी यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment