Friday, 12 February 2021

माजी सैनिकांसाठी रिझर्व बँकेत सुरक्षा गार्डची भरती

             जळगाव, (जिमाका) दि. 12 - भारतीय रिझर्व बँक, नागपूर यांनी कळविल्यानुसार भारतीय रिझर्व बॅकेमध्ये सुरक्षा गार्डची पदे माजी सैनिकामधून भरवयाची आहेत. त्यासाठी माजी सैनिकांनी https://opportunities.rbi.org.in/Scripts/bs या वेबसाईटच्या लिंकवर जाऊन ऑनलाईन रजिस्टे्रशन करावयाचे आहे. या संधीचा जळगाव जिल्ह्यातील जास्तीत जास्त माजी सैनिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन राहूल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

00000

No comments:

Post a Comment