जळगाव, दि. 24 (जिमाका वृत्तसेवा) : जात वैधता प्रमाणपत्राकरीता ऑनलाइन अर्ज करण्यासंदर्भात मोफत वेबिनारचे 25 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 1.00 वाजता आयोजन करण्यात आले आहे, असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगावचे उपायुक्त वैशाली हिंगे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
आवश्यक दस्ताऐवज स्कॅन करुन अपलोड करणे व त्यानंतर अर्ज ऑनलाईन सबमिट करणे आवश्यक आहे. या पुर्तता केल्यानंतर अर्जाची प्रिंट काढुन विहीत मार्गाने पुर्वीप्रमाणेच सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत या समितीस अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. मा. महासंचालक डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुर्ण यांचे निर्देशानुसार या प्रक्रियेची सर्वसामान्य नागरीक व अर्जदारांना माहीती व्हावी या दृष्टीकोनातुन वार गुरुवार दिनांक 25 फेब्रुवारी, 2021 रोजी दुपारी 1.00 वाजता वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या वेबिनारची zoom meeting ID ८३८७०९३५०४३ Passcode- yyyiid२१२० अशी लिंक आहे. या वेबिनार मध्ये सहभाग घेण्यास इच्छुक असलेल्या नागरीकांनी zoom App डाऊनलोड करुन त्याव्दारे वेबिनारमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन उपायुक्त श्रीमती हिंगे यांनी केले आहे.
०००००
No comments:
Post a Comment