जळगाव, (जिमाका) दि. 11 - पोलिस अधिक्षक कार्यालय व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बेटी बचाओ, बेटी पढाओ व वन स्टॉप सेंटर अंतर्गत, जिल्हास्तरीय एक दिवसीय कार्यशाळा “orientation program” 4 फेब्रुवारी, 2021 रोजी मंगलम हॉल, पोलीस कवायत मैदान, जळगाव येथे घेण्यात आली. या कार्यशाळेस अध्यक्ष म्हणून पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. ठोंबरे, श्रीमती सुवर्णा कुळकर्णी, अध्यक्ष, बाल न्याय मंडळ, जळगाव वैजयंती तळेले, अध्यक्ष, बाल कल्याण समिती, जळगाव यांची उपस्थिती होती. तर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री संतोष शिंदे, संचालक, विधायक भारती तथा सदस्य बाल हक्क आयोग, मुंबई हे उपस्थीत होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना श्री. विजयसिंग परदेशी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव यांनी सांगितली. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री योगेश मुक्कावार, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, जळगाव यांनी केले तर बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 (JJAct) व लैगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 (POCSO) या विषयावर उपस्थीत बाल कल्याण पोलीस अधिकारी/पथक बाल न्याय मंडळ, सदस्य, बाल कल्याण समिती, सदस्य, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व कर्मचारी जिल्हा बाल संरक्षण कक्ष अधिकारी व कर्मचारी, अधिक्षक बालगृह/निरीक्षण गृह चाईल्ड लाईन समुपदेशक महानगरपालिका व सामान्य रुग्णालय येथील तालुका अधिकारी यांना श्री. संतोष शिंदे, संचालक, विधायक भारती तथा सदस्य बाल हक्क आयोग, मुंबई मार्गदर्शन केले
सदरचा कार्यक्रम 150 ते 200 प्रशिक्षणार्थीच्या उपस्थीतीत पार पडला. शेवटी श्री. विजयसिंग परदेशी यांनी उपस्थीत मान्यवर व प्रशिक्षणार्थीचे आभार व्यक्त केले.
००००
No comments:
Post a Comment