Thursday, 25 February 2021

जळगाव जिल्ह्यात 10 एप्रिल रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

             जळगाव, दि. 25 (जिमाका वृत्तसेवा) :  प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी आणि सामोपचाराने तडजोड घडवून वाद मिटविण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा वकील संघातर्फे जळगाव जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये 10 एप्रिल, 2021 या एकाच दिवशी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

            जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात लोकअदालत होईल. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी अध्यक्षस्थानी असतील. जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, महानगरपालिका आयुक्त, जिल्हा वकील संघाचे पदाधिकारी आदींचे सहकार्य लाभणार आहे.

            या लोकअदालतमध्ये मोटार वाहन वाहतूक चलन, भूसंपादन, धनादेश अनादर, वैवाहिक खटले, मोटार अपघात खटले, म्युनिसीपल अपील, दिवाणी व फौजदारी प्रकरणे, न्यायालयात प्रलंबित इतर खटले, व खटले दाखलपूर्व प्रकरणे तसेच ज्या खटल्यांमध्ये कायद्याने तडजोड करता येणे शक्य आहे, असे खटले तडजोडीने निकाली काढण्यात येतील. याशिवाय राष्ट्रीयकृत बँका, कंपनी, मोबाईल कंपनी, दूरध्वनी कार्यालयांनी थकीत रकमेमध्ये सूट देण्याबाबत प्रस्तावित केलेले आहे. औद्योगिक, कामगार, सहकार न्यायालय तसेच ग्राहक तक्रार निवारण मंचकडील तडजोड योग्य प्रकरणेदेखील लोकअदालतीत सादर करण्यात येणार आहेत.

                                                                               00000

No comments:

Post a Comment