जळगाव, दि. 24 (जिमाका वृत्तसेवा) : जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा (कोविड -19) प्रादुर्भाव वाढत आहे. बाधित रुग्णाच्या संख्येत वाढ होत असल्याने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथील पक्क्या अनुज्ञप्तीसाठी येणाऱ्या उमेदवारांची चाचणी या कार्यालयाच्या मोहाडी परिसरातील ब्रेक टेस्ट ट्रॅकवर घेण्यात येईल. नवीन वाहन नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहनाची तपासणी संबंधित वाहन वितरकाच्या शोरुममध्ये होईल. नागरिकांनी नोंद घेवून सहकार्य करावे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा प्रभारी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, महेश देशमुख जळगाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment