Tuesday, 13 June 2023

महिला लोकशाही दिन 19 जून रोजी होणार ऑनलाईन

  जळगाव, दि. 13 (जिमाका वृत्तसेवा): जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार 19 जून, 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महिला लोकशाही दिनाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे.

  समस्याग्रस्त व पीडीत महिलांना प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, त्यांच्या हक्कांचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा, समाजातील पिडित महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, म्हणून महिला लोकशाही दिन जिल्हास्तरावर दर महिन्याचा तिसऱ्या सोमवारी व तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी राबविण्यात येतो. त्यानुसार महिला लोकशाही दिन ऑनलाईन आयोजीत करण्यात आलेला आहे. या लोकशाही दिनी ज्या महिलांना अर्ज करायचा असेल त्यांनी आपला अर्ज आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या ई- मेलवर पाठवावा. तसेच अर्जामध्ये आपला व्हॉटसॲप क्रमांक नमूद करावा, जेणेकरुन या लोकशाही दिनाची लिंक व पासवर्ड अर्जदारास उपलब्ध करुन देणे शक्य होणार आहे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

अर्ज पाठविण्यासाठी ईमेल आयडी याप्रमाणे: जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव- dwcwjal@gmail.com, तहसीलदार, जळगाव- tahasildarjalgaon@gmail.com, तहसीलदार, जामनेर- tah.jamner@gmail.com, तहसीलदार, एरंडोल- erandoltahsil123@gmail.com, तहसीलदार, भुसावळ- tahsilbhusawal@gmail.com, तहसीलदार, धरणगाव- dharangaon2014@gmail.com, तहसीलदार, बोदवड- tahsilbodwad@gmail.com तहसीलदार, यावल- tyawal@gmail.com, तहसीलदार, रावेर- tahsilraver@gmail.com, तहसीलदार, भडगाव- tahsildarbhadgaon@gmail.com, तहसीलदार, चाळीसगाव- tahsildar40gaon@gmail.com, तहसीलदार, अमळनेर- amalnertahsil@gmail.com, तहसीलदार, पारोळा- parolatahsil@gmail.com, तहसीलदार, पाचोरा-  tahsilpachora@gmail.com, तहसीलदार, मुक्ताईनगर- tahsilmkt@gmail.com, तहसीलदार, चोपडा- tahsildarchopda@gmail.com  तरी संबंधित तालुक्यातील महिलांनी आपल्या तालुक्याचे तहसिलदार यांचे मेलवर अर्ज पाठवावे. असेही जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment