Monday, 19 June 2023

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह मुक्ताईनगर येथे प्रवेश प्रक्रिया सुरु

         जळगाव, दि. १९ (जिमाका वृत्तसेवा) :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह मुक्ताईनगर  येथे  सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशप्रक्रिया सुरु झाली आहे.

  प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या इयत्ता ८ वी ते महाविदयालयीन शिक्षण घेणाऱ्या गरजू विदयार्थ्यांना सदर प्रवेशासाठी अर्ज वसतिगृह कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत.

          परिपूर्ण भरलेला अर्ज  आवश्यक त्या कागदपत्रांसह कार्यालयात जमा करावेत. प्रवेश पात्रतेच्या अटी व नियम प्रवेश अर्जासोबत पहावयास मिळतील. वसतीगृह प्रवेश रिक्त जागांवर गुणवत्तेनुसार दिला जाईल. तरीविद्यार्थ्यांनी वरील पत्त्यावर संपर्क साधावा

          वसतिगृहात निवड झालेल्या प्रवेशितांना शासनामार्फत मोफत निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य तसेच महाविदयालयीन विदयार्थ्याना साहित्यासाठी रुपये ४०००/- रोख तसेच दरमहा निर्वाह भत्ता रुपये ५००/- व इतर अनुषंगिक सुविधा दिल्या जातील,  असे आवाहन  गृहपाल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह मुक्ताईनगर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

०००००

 


No comments:

Post a Comment