जळगाव दि. २३ (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या शासकीय वसतीगृहामध्ये सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. जळगांव जिल्हयातील एकूण १२ शासकीय वसतीगृहासाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
जिल्हयातील शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसुचितजाती,
अनुसुचितजमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग,
दिव्यांग, अनाथ, या प्रवर्ग निहाय आरक्षण निश्चित केल्यानुसार इयत्ता ७ वी, १० वी,
व १२ वी, उत्तीर्ण विद्यार्थी तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील इतर शैक्षणिक/
व्यवसायीक अभ्यासक्रमातील प्रथम वर्षाच्या प्रवेशित विद्यार्थ्यांना समाज कल्याण
विभागाच्या शासकीय वसतीगृहात प्रवेश घेता येईल. सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात
रिक्त जागांवर प्रवेश देण्याची प्रक्रिया खालील वसतीगृहांमध्ये सुरु आहे.
जिल्हयात कार्यरत
असलेल्या शासकीय वसतीगृहांचा तपशिल
वसतीगृहाचे नांव-
१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह नळगांव २)
मागासवर्गीय गुणवंत मुलांचे शासकीय वसतीगृह, जळगांव ३) मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्टया
मागासवर्गीय मुलीचे शासकीय वसतीगृह,जळगांव
४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, भुसावळ जि. जळगांव ,
५) मागासवर्गीय मुलीचे शासकीय वसतीगृह,
भुसावळ जि. जळगाव ६) डॉ. बाबासाहेब
आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, बोदवड जि. जळगांव ७)डॉ.
बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, मुक्ताईनगर जि. जळगांव ८) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे
शासकीय वसतीगृह, अमळनेर जि.जळगांव ९) मागासवर्गीय
मुलीचे शासकीय वसतीगृह, अमळनेर जि.जळगांव, १०) मागासवर्गीय तथा आर्थिक दृष्टया
मा.व. मुलीचे शासकीय वसतीगृह, चाळीसगांव जि. जि. जळगांव ११) मागासवर्गीय तथा
आर्थीकदृष्टया मागासवर्गीय मुलीचे शासकीय वसतीगृह रावेर जि. जळगाव, १२) मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, रावेर
जि.जळगांव
वसतीगृह प्रवेशित विद्याथ्र्यांना भोजन, निवास, दरमहा निर्वाहभत्ता,
शैक्षणिक साहित्यासाठी रोख रक्कम, गणवेश / ड्रेसकोड रक्कम, इत्यादी अनुषंगिक इतर सोयी-सुविधा शासना मार्फत
विनामुल्य पुरविण्यात येतात. विद्याथ्र्यांना ज्या वसतीगृहात प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी
अर्ज प्राप्त करुन आवश्यक त्या कागदपत्रांसह विहित वेळेत सादर करावेत.
विद्यार्थ्यांनी गैरसोय टाळण्यासाठी आपले प्रवेश अर्ज विहोत वेळेत समक्ष परिपूर्ण
माहितीसह संबंधित वसतीगृहात सादर करावेत. अधिक माहितीसाठी संबंधित वसतीगृह तसेच
संबंधित जिल्हयाचे सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय जळगांव येथे संपर्क साधावा,
असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण योगेश
पाटील, यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
००००००
No comments:
Post a Comment