जळगाव, दि.१९ (जिमाका वृत्तसेवा) : - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग संचलित मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह बोदवड, जामनेर रोड बोदवड येथे असून सदर वसतिगृहात सन २०२३-२४ या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु आहे.
सदर
प्रवेशासाठी अर्ज वसतिगृह कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत. परिपूर्ण भरलेला
वसतिगृह कार्यालयात जमा करावेत. प्रवेश पात्रतेच्या अटी व नियम प्रवेश अर्जासोबत
पहावयास मिळतील. वसतिगृह प्रवेश रिक्त जागांवर
गुणवत्तेनुसार दिला जाईल.
तरी डॉ. मागासवर्गीय मुलांचे
शासकीय वसतिगृह बोदवड, जामनेर रोड बोदवड येथे संपर्क साधावा, वसतिगृहात निवड
झालेल्या प्रवेशितांना शासनामार्फत मोफत निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य व इतर
सुविधा दिल्या जातील असे मागासवर्गीय मुलांचे शासकीय वस्तिगृह बोदवड यांनी एका
प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment