Saturday, 24 June 2023

‘शासन आपल्या दारी’ अभियानातंर्गत जळगावात 27 जून रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

        जळगाव, दि. २४ (जिमाका वृत्तसेवा) - शासन आपल्या दारी अभियानातंर्गत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, 27 जून, 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता नुतन मराठा महाविद्यालय येथे ऑफलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती वि. जा. मुकणे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

             नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी असून सर्वसाधारण १० वी १२ वी सर्व पदवीधारक/आयटीआय सर्व ट्रेड/डिप्लोमा सर्व ट्रेड/बीई मेकॅनिकल/बीसीए/एमबीए/बीई/डी. फॉर्म/बी.फॉर्म/सर्व डिग्रीधारक असे एकूण २२४१ रिक्तपदे भरण्याविषयी विविध कंपन्यांनी कळविलेले आहे.

            या मेळाव्यात नमूद पात्रता धारण केलेल्या ईच्छुक उमेदवारांनी सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्तपदांना अॅप्लाय करण्यासाठी आपल्या युजरआयडी व पासवर्ड ने लॉग-इन करून अॅप्लाय करावा. तसेच उमेदवारांनी नावनोंदणी केलेली नाही त्यांनी देखील सर्व शैक्षणिक पात्रतेच्या कागदपत्रांसह मेळाव्यात मुलाखतीसाठी हजर रहावे. तसेच विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नांव नोंदणी देखील करुन घ्यावी.

याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (सकाळी ९.४५ ते संध्या ६.१५) या वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक ०२५७-२९५९७९० वर संपर्क साधावा. असेही श्री. मुकणे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे

000000

No comments:

Post a Comment