जळगाव, दि.१९(जिमाका वृत्तसेवा) : - अपंग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र देगलूर या संस्थेत महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परिक्षा मंडळ मुंबई मार्फत शासन मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी १८ ते ४० वयोगटातील अपंग व मुकबधीर मुला मुलींना प्रवेश देण्यात येत आहे.
सदरील प्रशिक्षण केंद्रात शिवण कर्तनकला, कॉम्प्युटर अकॉऊटींग व ऑफीस
ऑटोमेशन व वेल्डर कम फॅब्रीकेटर, इत्यादी अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येत आहे.
प्रवेशितांची निवासाची व जेवणाची विनामुल्य सोय केलेली आहे.
तरी इच्छुक अपंक,
मुकबधीर व मतिमंद
मुला-मुलींनी किंवा पालकांनी दिनांक ५ जुलै, २०२३ पर्यंत प्राचार्य, तुळजा भवानी
अपंग प्रशिक्षण केंद्र, देगलूर जि. नांदेड
मोबाईल क्रमांक 9960900369, 7378641136, 9403207100, 9420846887 येथे संपर्क साधावा आथवा
प्रत्यक्ष भेटावे, असे आवाहन प्राचार्य तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र देगलूर
जि. नांदेड यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
०००००
No comments:
Post a Comment