Saturday, 24 June 2023

शासन आपल्या दारी अभियानातंर्गत महसूल विभागातर्फे पारोळा तालुक्यातील पशुहानीग्रस्त कुटुंबांना मदतीचा आधार

               जळगाव, दि. २४ (जिमाका वृत्तसेवा) - महाराष्ट्र शासनामार्फत नैसर्गिक आपत्तीमुळे घरपडझड, वित्तहानी, पशुहानी, जिवीतहानी झाल्यास महसूल विभागमार्फत संबंधित लाभांना मुदतीत मदत देणे अपेक्षित असते. नैसर्गिक आपत्ती दरम्यान पशुधनाचा मृत्यु झाल्यास शासन निर्णय 27 मार्च, 2023 अन्वये मदत देण्याची तरतुद आहे.

गेल्या 20 एप्रिल, 2023 रोजी मौजे टिटवी, तालुका पारोळा येथील शेतकरी श्री पुना रामा खैरनार यांची म्हैस वादळी पावसात वीज कोसळल्याने दगावली होती. त्याप्रमाणे 28 एप्रिल, 2023 रोजी मौजे म्हसवे, तालुका पारोळा येथील शेतकरी श्री सुरेश महादु पाटील यांची गाय वादळी पावसात वीज कोसळल्याने दगावली होती. या घटनांची माहिती महसूल प्रशासनाला मिळाल्यानंतर तात्काळ पंचनामा व पशुवैद्यकीय अधिकारी यांचेमार्फत पशुंचा पोस्टमार्टम रिपार्ट प्राप्त करुन घेण्यात आला. शासन आपल्या दारी अभियानातंर्गत नुकसानग्रस्त कुटुंबियांना शासनातर्फे मदत मिळण्यासाठी कागदपत्रांची पुर्तता करुन परिपुर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव यांना सादर करण्यात आला.

त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव यांचे कार्यालयाकडुन मदत म्हणुन प्रत्येकी 37 हजार 500 रुपये प्रमाणे दोन्ही लाभाार्थ्यांना मदतीचे धनादेश आमदार चिमणराव पाटील यांचे हस्ते व तहसिलदार डॉ उल्हास देवरे यांच्या उपस्थितीत तहसिल कार्यालय, पारोळा येथे वितरित करण्यात आले. जिल्हा प्रशासनाने केलेल्या तातडीच्या मदतीबद्दल दोन्ही लाभार्थ्यांनी शासन व महसूल प्रशासनाचे आभार मानले.

000000

No comments:

Post a Comment