Monday, 12 June 2023

समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे आज जळगावात,विद्यापीठात कार्यक्रमांना उपस्थिती, विविध संस्थाना भेटी देणार .

 जळगाव (दि.१२/०६/२०२३) राज्याचे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे हे नाशिक विभागाच्या दौ-रावर आले आहेत. नाशिक विभागात त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन समाज कल्याण विभागाकडुन करण्यात आले आहे. आज दिनांक १३ रोजी सकाळी ११ वाजता जळगाव येथे कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना व समान संधी केंद्र समन्वय नाशिक विभागीय कार्यशाळेस ते मार्गदर्शन करणार आहेत. सदर कार्यक्रमांमध्ये समाज कल्याण विभागाच्या लाभार्थ्यांना लाभाचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी १:३० वाजता विद्यापीठ परिसराची पाहणी करणार आहेत. मुळजी जेठा महाविद्यालयास दुपारी ३:३० वाजता ते नाशिक विभागातील समाज कल्याण अधिकारी यांच्याकडून बैठकीत विविध योजनाचा आढावा घेणार आहेत. सायंकाळी ४:३० वाजता मातोश्री वृद्धाश्रम जळगाव येथे व सायंकाळी ५:३० वाजता दीपस्तंभ फाउंडेशनच्या मनोबल प्रकल्पास भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांशी ते संवाद साधणार आहे. त्यानंतर रात्री नाशिक कडे प्रस्थान करणार आहेत. अशी माहिती श्री वाय .एस. पाटील सहायक आयुक्त समाज कल्याण जळगाव यानी दिली आहे.

---------------------------------

No comments:

Post a Comment