जळगाव, दि. १ (जिमाका वृत्तसेवा) :- इयत्ता दहावी, बारावी पास विद्यार्थी व बेरोजगार युवकांना रोजगार व स्वंयरोजगाराची संधी उपलब्ध होणेसाठी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागमार्फत शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धरणगांव यांच्या विद्यमाने श्री मंगल कार्यालय अॅण्ड लॉन्स, जी. एस. नगर, तहसिल कार्यालयामागे, धरणगाव येथे शुक्रवार, २जुन, २०२३ रोजी सकाळी ठिक १०.३० वाजता छत्रपती शाहु महाराज युवाशक्ती करीअर शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे
हस्ते होणार असून शिबीरात युवक व पालकांना विविध क्षेत्रातील अनुभवी तज्ञ व नामांकित
व्यक्तींचे मार्गदर्शन मिळणार आहे. तरी या शिबिरास युवक, विद्यार्थ्यांनी मोठया
संख्येने उपस्थित राहवे, असे आवाहन प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,
धरणगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
00000
No comments:
Post a Comment