जळगाव, दि. २८ ऑगस्ट, (जिमाका वृत्तसेवा) – दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दि. १ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अल्पबचत सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री माळी यांनी दिली आहे.
या
दिवशी विविध विषयांवरील तक्रारींबाबत तक्रारदार प्रत्यक्ष अर्जासह उपस्थित राहणार असून,
संबंधित विभागप्रमुखांची उपस्थिती अनिवार्य आहे.
नागरिकांनी
आपल्या तक्रारी व समस्या घेऊन लोकशाही दिनी उपस्थित राहावे, असे आवाहनही निवासी उपजिल्हाधिकारी
यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
000000000000
No comments:
Post a Comment