Friday, 24 November 2017

27 नोव्हेंबरपासून रोजी चाचा नेहरु बालमहोत्सवाचे आयोजन



जळगाव दि. 24 :- बालकल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शासकीय, स्वयंसेवी संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार, उन्मार्गी मुलांमधील सुप्त गुणांना वाव मिळावा. त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव, सांघिक भावना निर्माण व्हावी. यासाठी बालकल्याण क्षेत्रात कार्यरत संस्थांमधील मुले व इतर मुले यांचेकरीता चाचा नेहरु बालमहोत्सव-2017 चे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवाचे उदघाटन सोमवार 27 नोव्हेंबर, 2017 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा क्रिडा संकुल, जळगाव येथे आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचे प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
तसेच 27 ते 29 नोव्हेंबर 2017 या कालावधीत जिल्हा क्रिडा संकुल, जळगाव येथे विविध क्रिडा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रमेश काटकर यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.    
00000

No comments:

Post a Comment