जळगाव,
दि. 28 - उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात
परिवहनेत्तर संवर्गातील दुचाकी वाहनांची नवीन नोंदणी 7 डिसेंबरपासून सुरु करण्यात
येत असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी दिली.
ज्या वाहनधारकांना आपल्या वाहनांसाठी
आकर्षक व पसंतीचा क्रमांक हवा असेल त्यांनी 4 व 5 डिसेंबर, 2017 या दोन दिवशी
दुपारी चार वाजेपर्यंत अर्ज करावेत. अर्जासोबत शासकीय शुल्काचा डीडी उपप्रादेशिक
परिवहन अधिकारी, जळगाव यांच्या नावे ओळखपत्रासह कार्यालयात सादर करावा. विहित
शुल्काच्या रकमेचा भरणा मालिका सुरु झाल्यावर करुन आकर्षक व पसंतीचे नोंदणी
क्रमांक प्राप्त करुन घ्यावेत. आकर्षक क्रमांकासाठी शुल्क भरल्यावर वाहनाचे
कागदपत्र तात्काळ सादर करणे आवश्यक राहील. अधिक माहितीसाठी उप प्रादेशिक परिवहन
अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा. असेही श्री. पाटील यांनी कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment