जळगाव, दि. 28 - अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी
राबविण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यासाठी येथील
अल्पबचत भवन येथे कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यशाळेस महाराष्ट्र
अल्पसंख्याक आयोगाचे अधिकारी श्री. सुरवसे यांनी महाराष्ट्र शासनाच्या
अल्पसंख्यांक विकास विभाग, महाराष्ट्र अल्पसंख्यांक आयोग, वक्प बोर्ड, उर्दु साहित्य
ॲकॅडमी यांच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली. तर मौलाना आजाद
अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अधिकारी एन. आर. खान व शकील शेख यांनी
महामंडळाच्या कर्ज योजनांची माहिती दिली.
या कार्यशाळेस महापालिकेचे अपर
आयुक्त श्री. कानडे, गृह शाखेचे नायब तहसीलदार श्री. मोरे श्री. करीम सालार,
अध्यक्ष, इकरा एज्युकेशन सोसायटी, श्री. फारुक शेख, अध्यक्ष, मणियार बिरादरी,
श्री. जहांगीर खान, प्रदेश अध्यक्ष, अल्पसंख्यांक सेवा संघ, श्री. अजुम रिझवी,
मुमताज बी सईद बागवान, नगराध्यक्ष बोदवड, अनिता येवले, नगराध्यक्षा सावदा, सुरेखा
कोळी, नगराध्यक्षा यावल, जहीर शेख, उप नगराध्यक्ष, एरंडोल, सलीम इनामदार,
अल्पसंख्याक फाउंडेशन, जळगाव तसेच जळगाव जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यलयांचे
अधिकारी, कर्मचारी, नगरपालीकांचे अधिकारी, कर्मचारी व अल्पसंख्यांक कल्याणात
कार्यरत विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या,
असे जिल्हा व्यवस्थापक, मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ, जळगाव
यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment