जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 19 - जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव बीटीआरआय, जळगाव आणि जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय जळगाव यांचे संयुक्त विद्यामाने दि. 25 ते 27 नोव्हेंबर, 2020 या कालावधीत कोविड विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता ऑनलाईन पध्दतीने पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या अनुषंगाने जळगाव जिल्हा व जिल्हयाबाहेरील आस्थापना / कंपन्यांमधील विविध प्रकारच्या रिक्तपदांव्दारे मोठी सुवर्णसंधी जिल्ह्यातील युवक युवतींसाठी देऊ केलेली आहे. या मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडुन www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर विविध शैक्षणिक पात्रतेची एकूण 90 रिक्तपदे अधिसुचित करण्यात आलेली आहेत. यासाठी विभागाच्या वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि रिक्तपदांसाठी पात्रतेप्रमाणे मँचिंग होणाऱ्या किंवा ऑनलाईन् अप्लाय केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती उदयोजकांच्या सोईनुसार शक्य असेल तिर्थ ऑनलाईन् किंवा ऑफ लाईन पध्दतीने घेतल्या जातील.
उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी ऑनलाईन् अॅप्लाय खालीलप्रमाणे करावा.
www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट दयावी किंवा प्लेस्टोअरमधून mahaswayam ॲप्लीकेशन मोफत डाऊनलोड करुन इन्स्टॉल करावे, Employment पेजवरील job Seeker हा पर्याय निवडून आपला नोंदणी /आधार क्रमांक व पासवर्डने साईन –इन/ लॉग –ईन करावे, आपल्या होम पेज वरील Job Fair हा पर्याय निवडा, जळगाव जिल्हा निवडा व फिल्टर बटनावर क्लिक करा, रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी Jalgaon Online Job Fair दि. 25 नोव्हेंबर,2020 ते 27 नोव्हेंबर,2020 या ओळीतील ॲक्शन मेनूतील दुसऱ्या बटनावर क्लिक करा I Agree हा पर्याय निवडा, पात्रतेनुसार मॅचींग झालेल्या विविध कंपन्यांच्या रिक्त पदांसाठी Apply बटनावर क्लिक करा
या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घेण्यासाठी www.rojgar.mahaswayam.gov.in वेबपोर्टलला लॉग – इन करावे व लाभ घ्यावा, याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन वेळेत 0257-2239605 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन श्रीमती अनिसा तडवी, सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
०००
Thursday, 19 November 2020
पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 25 ते 27 नोव्हेंबर दरम्यान आयोजन
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment