Thursday, 19 November 2020

अंत्योदय अन्न योजना कार्डधारकांसाठी डिसेंबर महिन्याचे धान्य उपलब्ध

    जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 19 - पणन हंगाम 2019-20 (रब्बी) अंतर्गत खरेदी केलेले भरडधान्य (ज्वारी व मका) सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वाटप करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. सदर भरडधान्य गव्हाचे परिमाण कमी करुन त्याच प्रमाणात भरडधान्य (ज्वारी व मका) वाटप करण्याच्या सुचना आहेत. माहे डिसेंबर, 2020 च्या नियतनात भरडधान्य (ज्वारी व मका) अंत्योदय अन्न योजना कार्डधारकांना वितरीत करण्यात येणार आहे.
      त्यानुसार अंत्योदय  योजना  कार्ड धारकांसाठी   गहू 8 कि.ग्रॅ. प्रती किलो 2 रुपये दराने, ज्वारी  5कि.ग्रॅ. प्रती किलो 1 रुपये दराने, मका 12 कि.ग्रॅ. प्रती किलो 1 रुपये दराने जळगाव, एरंडोल, धरणगाव, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, अमळनेर, पारोळा व चोपडा या तालुक्यांना मंजुर करण्यात आला आहे. तसेच हे तालुके वगळून उर्वरीत तालुक्यांना ज्वारी साठा अत्यल्प असल्याने ज्वारी ऐवजी मका 17 कि.ग्रॅ. प्रती किलो 1 रुपये  दराने  व तांदुळ 10 कि. ग्रॅ. प्रती किलो 3 रुपये दराने  या दराने प्रति कार्ड वितरीत करण्यात येणार आहे. सदर लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन अभिजित राऊत, जिल्हाधिकारी, जळगाव यांनी एक प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. 

No comments:

Post a Comment