Thursday, 12 November 2020

अनाथ प्रमाणपत्र पंधरवाडा राबविण्यासाठी कार्यशाळा संपन्न

 


             जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 12 - आयुक्त, महिला व बाल विकास विभाग, पुणे यांचे निर्देशानुसार बाल दिनाचे औचित्य साधुन 14 ते 21 नोव्हेंबर 2020 ‘‘बाल सुरक्षा सप्ताह’’ व ‘‘दत्तक सप्ताह’’ तसेच 14 ते 30 नोव्हेंबर, 2020 या कालावधीत ‘‘अनाथ प्रमाणपत्र पंधरवाडा’’ राबविणेबाबत कार्यशाळा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जळगावमार्फत संपन्न झाली.

            या कार्यक्रमास जिल्ह्यातील महिला व बाल विकास विभाग, पोलीस विभाग, आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर याचे पालन करुन कार्यक्रम घेण्यात आला.

            कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन जिल्हाधिकारी अभिजित राऊत, प्रमुख पाहुण पोलिस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण, श्रीमती वैजयंती तळेल, अध्यक्ष, बाल कल्याण समिती, जळगाव ॲड. प्रदिप पाटील, सदस्य, बाल कल्याण समिती, जळगाव डॉ. निरज देव, सदस्य, बाल न्याय मंडळ जळगाव श्रीमती भदादे मॅडम, सदस्य, बाल न्याय मंडळ, जळगाव आदि उपस्थित होते.

            या कार्यशाळेस जिल्हाधिकारी यांनी बालकांचे शोषण हे जवळच्या नातेवाईकांकडून होत असल्याने घटना घडतात. त्यामुळे नागरिकांनी जागृत राहुन ह्या घटनांवर प्रतिबंध करणे आवश्यक आहे. तसेच शिक्षण विभाग व महिला व बाल विकास विभागाने Good Touch व  Bad Touch चे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देणेबाबत अपेक्षा व्यक्त केली. पोलीस अधिक्षक डॉ. मुंडे यांनी बालकांबाबतचे कायद्याविषयी पोलिस विभागातील अधिकारींना माहिती असणे आवश्यक आहे तसेच बाल संरक्षणाबाबत काम करणाऱ्या प्रत्येकाने संवेदनशीलपणे भूमिका बजावली पाहिजे असे मत व्यक्त केले.

            कार्यशाळेस दत्तक प्रक्रियेस प्रोत्साहन, प्रेरणा देण्यासाठी तसेच बालकांच्या सुरक्षा बाबतच्या समस्यांबाबत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्ह्यातील अनुदानित व विनाअनुदानित संस्थांमधील प्रवेशित बालकांना अनाथ प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी अनाथ प्रमाणपत्र पंधरवाडा राबविण्यात येणार आहे तसेच बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान व वन स्टॉप सेंटरची माहिती देण्यात आली.

            कार्यक्रमाची प्रस्तावना विजयसिंग परदेशी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव यांनी करताना ‘‘बाल सुरक्षा सप्ताह’’ व ‘‘दत्तक सप्ताह’’ नोव्हेंबर 2020 तसेच दि. 14 नोव्हेंबर, 2020 ते 30 नोव्हेंबर, 2020 या कालावधीत ‘‘अनाथ प्रमाणपत्र पंधरवाडा’’ राबविणेबाबत कार्यक्रमांची माहिती दिली. तर दत्तक प्रक्रियेबाबत न्यायालयीन प्रक्रिया व बालकांचे संरक्षण व उपाय याबाबत ॲड. प्रदिप पाटील, सदस्य, बाल कल्याण समिती, जळगाव, डॉ. निरज देव, सदस्य, बाल न्याय मंडळ, जळगाव यांनी मार्गदर्शन केले. तर सुत्रसंचालन श्रीमती जयश्री पाटील, अधिक्षिका मुलींचे बालगृह, जळगाव यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी योगेश मुक्कावार, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, यशश्री पाटील, जिल्हा महिला बाल विकास कार्यालय व जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जळगाव अधिकारी, कर्मचारी यांनी कार्यशाळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.

            कार्यक्रमास जिल्हा व तालुक्यातील पोलिस विभागाचे विशेष बाल पोलिस पथकाचे बाल कल्याण पोलिस अधिकारी, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी व कर्मचारी, बालगृह अधिक्षक व कर्मचारी, तालुका संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी हे उपस्थित होते. आभार श्री. एस. आर. पाटील, जिल्हा परिविक्षा अधिकारी, जळगाव यांनी मानले.

00000

No comments:

Post a Comment