Friday, 6 November 2020

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नोव्हेंबर महिन्याच्या मासिक शिबीर दौऱ्यात बदल

             जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि.6:-   जळगाव जिल्हयातील सर्व नागरीकांना कळविण्यात येते की, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव मार्फत तालुकानिहाय वर्षभर मासिक दौरा आयोजित करण्यात येत असतो. माहे नोव्हेंबर 2020 च्या  मासिक शिबीर दौऱ्यात बदल करण्यात आला असून तालुका निहाय बदल खालील प्रमाणे

              अमळनेर – पहिला सोमवार व चौथा मंगळवार, जामनेर- दुसरा गुरुवार, पाचोरा - पहिला बुधवार  भुसावळ – पहिला गुरुवार व चौथा गुरुवार, धरणगाव – चौथा शुक्रवार, चाळीसगाव दुसरा सोमवार व चौथा सोमवार, सावदा पहिला शुक्रवार, चोपडा तिसरा मंगळवार, रावेर दुसरा मंगळवार, बोदवड – तिसरा बुधवार, भडगाव चौथा बुधवार, पारोळा – दुसरा बुधवार, मुक्ताईनगर पहिला मंगळवार,

        सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी असलेला मासिक दौरा पुढील सुयोग्य दिनांकास आवश्यकतेनुसार आयोजित करण्यात येईल अन्यथा रद्द समजण्यात येईल, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

०००

No comments:

Post a Comment