Tuesday, 10 November 2020

विदेशातून अनाधिकृतपणे आयात केलेले आणि स्थानिक पातळीवर अनधिकृतपणे उत्पादित केलेल्या फटाक्यांची विक्री करणे अवैध

             जळगाव, (जिमाका) दि. 10 - विदेशातून अनाधिकृतपणे आयात केलेले आणि स्थानिक पातळीवर अनधिकृतपणे उत्पादित केलेले फटाके जवळ बाळगणे, त्यांचा साठा करणे आणि त्यांची विक्री करणे कायद्यानुसार अवैध आणि दंडनीय असल्याचे अभिजित राऊत, जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांनी कळविले आहे.

            दीपावली सणाच्या पार्श्वभुमीवर विदेशातून अनधिकृतपणे आयात केलेल्या फटाक्यांची साठवणूक व विक्रीस प्रतिबंध करण्याकरिता फटाके विक्री करण्यासाठी परवानगी देणा-या सर्व यंत्रणांनी करावयाच्‍या कार्यवाहीबाबत सुसुत्रता आणण्यासाठी व उपाययोजनांसाठी मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

            त्यामुळे विदेशातून अनधिकृतपणे आयात केलेले आणि स्थानिक पातळीवर अनधिकृतपणे उत्पादित केलेले फटाके जवळ बाळगणे, त्यांचा साठा करणे आणि त्यांची विक्री करणे कायद्यानुसार अवैध आणि दंडनीय असल्यामुळे विदेशातून अनधिकृतपणे आयात केलेले आणि स्थानिक पातळीवर अनधिकृतपणे उत्पादित केलेले फटाके जर कोणी जवळ बाळगत असेल, त्याचा साठा करत असेल किंवा त्यांची विक्री करत असेल. अशी बाब नागरीकांच्या निदर्शनास आल्यास त्यांनी स्वयंप्रेरणेने त्यांच्या क्षेत्रातील नजीकच्या पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार करावी. असे आवाहन अभिजित राऊत, जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment