जळगाव, दि. 3 (जिमाका वृत्तसेवा) :- जळगाव तालुक्यातील अवैध गौणखनिज वाहतुक करीत असताना जप्त केलेल्या वाहनमालकाविरुध्द दंडात्मक कार्यवाहीचे आदेश पारीत करण्यात आलेले आहे. परंतु या वाहनाचे मालक यांनी दंडात्मक कार्यवाहीच्या आदेशातील रक्कम शासन जमा केलेली नसल्याने सदर वाहने जंगम मालमत्ता अटकावून ठेवण्याचे अधिपत्र नमुना 3 कार्यवाहीतील रक्कम वसुल करणेकामी दिनांक 12 फेब्रुवारी, 2022 रोजी तहसिल कार्यालय, जळगाव येथे सकाळी 11 वाजता जप्त केलेल्या वाहनाचे लिलाव करण्यात येत आहे.
ट्रॅक्टर – एमएच – 19 बीजी-7690 –
119646 - 260000, ट्रॅक्टर – एमएच – 19 बीजी-1053 – 123018 - 240000, ट्रक – एमएच – 41 जी-6337 – 258938
- 200000, ट्रक – एमएच – 10
अे-9730 – 258938 - 260000, ट्रक – एमएच – 18 बी-7686 – 258938 - 180000, ट्रॅक्टर – एमएच – 19
अेएच-5250 – 119646 - 200000, ट्रॅक्टर – एमएच – 19 अेएन-4670 – 119646 - 200000, ट्रॅक्टर – QACL40606002947 – 128826
- 200000, ट्रॅक्टर – एमएच –
37 F-0321 – 119646 - 150000,
ट्रॅक्टर – एमएच – 19 BG-5018 –
119646 - 230000 ट्रॅक्टर – एमएच – 19 CV-5464 – 119646 - 225000
ट्रॅक्टर – WSCL45922980490 ट्रॉली क्रमांक MH-19 AN-9614 -128826- 270000
ट्रक – MH – 28 B -7961- 286478 - 170000, ट्रक
– एमएच – 19 Y-1553 – 286478 - 220000, ट्रॅक्टर – MBNAV53ACKN42235 – 123018-280000
ट्रॅक्टर – MH-19P-2444 – 128826 - 120000, डंपर-
GJ-34T-1769 – 128826- 40000, ट्रॅक्टर
– MBNAV53ACKA21631 -128826-270000, ट्रॅक्टर
– एमएच – 19 एपी-9960 – 143239 - 290000,
डंपर-
MH -19I-4796 – 239212- 320000, ट्रॅक्टर
– WQA40606123770 –128826 – 170000 ,
ट्रॅक्टर – एमएच – 19 एपी-8159 –
128826 - 230000, डंपर- एमएच -19 बीएम-7070 – 257652-
320000, डंपर- एमएच -04- जीएफ-8686–
239212- 170000,
सदर
लिलावात सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीना कळविण्यात येते की, त्यांनी लिलावात भाग
घेण्याचा अर्ज, लिलाव होणाऱ्या जंगम मालमत्तेची हातची किंमत, अनामत रक्कम
लिलावाच्या अटी व शर्ती या करीता तहसिलदार जळगाव यांच्याशी कार्यालयीन वेळेत
संपर्क साधावा, लिलावातील अटी व शर्ती खालील प्रमाणे.
लिलावात
भाग घेण्याची निविदा अर्जाचे शुल्क रु. 500/- प्रत्येक वाहनासाठी अर्जाचे शुल्क
वेगवेगळे भरावे लागतील सदरील रक्कम विनापरतावा असेल, लिलावात भाग घेताना विहीत
नमुन्यातील अर्ज दिनांक 11 फेब्रुवारी, 2022 रोजी सकाळी 11.00 वाजेपासुन ते
सायंकाळी 5.00 वाजेपर्यंतच तहसिल कार्यालय जळगाव येथे उपलब्ध राहील सायंकाळी 5.00
वाजेनंतर कुठल्याही परिस्थिती अर्ज स्विकारले जाणार नाही.
लिलावात
भाग घेतांना अर्ज विक्री केलेनंतर कुठल्याही सबबवर अर्ज रद्द अथवा परत घेतला जाणार
नाही व अर्ज फी परत मिळणार नाही, लिलावात भाग घेण्याऱ्या व्यक्तिीला प्रतिवाहन
अनामत रक्कम रु. 5000/- रोखीने जमा करणे आवश्यक आहे, लिलाव धारकाने सर्वोच्च
बोलीने वाहन घेतल्याबरोबरच त्या सर्वोच्च बोलीची रक्कम 24 तासाच्या आत चलनाने जमा
करावी लागेल, सदर वाहन लिलाव ठरलेल्या दिवशी सकाळी 11.00 वाजता सुरु होईल,
एकापेक्षा जास्त अधिक लिलाव असल्यास एका लिलावाची प्रक्रीया झाले नंतर पुढील लिलाव
सुरु करण्यात येईल, लिलावात भाग घेणाऱ्या व्यक्तीपैकी ज्याची बोली सर्वोच्च असेल
त्या व्यक्तीची अनामत लिलावाच्या सर्वोच्च बोलीच्या रकमेमध्ये समाविष्ठ करण्यात
येईल, सर्वोच्च बोली बोलणाऱ्या व्यक्तीने तीन दिवसांच्या आत सर्वोच्च बोलीची रक्कम
चलनाने सरकार जमा न केल्यास सदरची अनामत रक्कम 5000/- ही जप्त करण्यात येईल.
जप्त
केलेल्या वाहनाच्या लिलावा बाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जळगाव यांनी निश्चित
केलेले वाहनाचे मुल्यांकन अथवा इकडील कार्यालयाची प्रलंबित दंडाची थकबाकी रक्कम
यापैकी जी रक्कम जास्त असेल ती हातची किंमत (Upset Price) म्हणून धरण्यात येईल. व लिलावात भाग घेणाऱ्या
व्यक्तींनी सदर हातची किंमतीच्या पुढे बोली लावावी लागेल. लावण्यात येणारी बोली ही
रक्कम रु. 5000/- किंवा त्यांचे पटीत असेल
एका
लिलावात भाग घेणाऱ्या व्यक्तीस दुसऱ्या वाहन लिलावात भाग घ्यावयाचा असल्यास पुन्हा
रक्कम रु. 5000/- अनामत म्हणून भरावी लागेल, तहसिलदार किंवा त्यांचे अनुपस्थित
लिलाव करणाऱ्या अधिकाऱ्यास कोणत्याही पुरेशा कारणास्तव लिलाव वेळोवेळी तहकुब करता
येईल, परंतु 30 दिवसापेक्षा अधिक मुदतीसाठी विक्री तहकुब करण्यात आल्यास नवीन
उदघोषणा करण्यात येईल, जेव्हा विक्री कायम केली जाण्यास पात्र असेल तेव्हा,
खरेदीदार म्हणून जाहिर करण्यात आलेल्या लिलावाधारकास त्याने बोली केलेल्या
रक्कमेच्या पंचवीस टक्के रक्कमेचा धनादेश तात्काळ इकडील कार्यालयाकडे तहसिलदार
जळगाव या नावाने सादर करावा, अशा बोललेल्या बोलीच्या 25 टक्के रक्कम अनामत
ठेवण्यास कसुर केल्यास, ती मालमत्ता ताबडतोब विक्रीसाठी पुन्हा काढण्यात येईल व
अशा कसुरदार व्यक्तीने लिलावात भरलेली अनामत रक्कम रु. 5000/- सरकार जमा करण्यात
येईल. अशा विक्री रद्द करण्याच्या मागणीचा
अर्ज मा. जिल्हाधिकारी
जळगाव यांची संमत केल्यास विक्री रद्द होईल व नवीन विक्रीनुसार मा. उपविभागीय
अधिकारी जळगाव भाग आदेश देतील त्यानुसार कारवाई करण्यात येईल.
मा.
उपविभागीय अधिकारी जळगाव भाग हे स्वत: महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम
206 अन्वये विक्री द्द करु शकतील, प्रत्येक लिलावासाठी वेगळे बंधपत्र भरुन देणे
बंधनकारक आहे. तसेच रुपये 5000/- ही रक्कम यथस्थिती त्याने खरेदी घेतलेल्या
प्रत्येक लिलावामध्ये जमा करणे आवश्यक आहे.
लिलावात
भाग घेणाऱ्या व्यक्तीपैकी कोणीही लिलावामध्ये हातची रक्कम पेक्षा जास्त बोली न
बोलणाऱ्या लिलावामध्ये भाग घेणाऱ्या सर्व व्यक्तीचे लिलावात भाग घेण्यासाठी भरलेली
रक्कम रु. 5000/- सरकार जमा करण्यात येईल. सदर वाहन लिलावा संदर्भात सर्व अधिकार
तहसिलदार जळगाव यांचेकडे राखुन ठेवलेले आहे.
वाहन
लिलावाच्या दिनांकापुर्वी संबंधित वाहन मालकाने दंडाची रक्कम शासनजमा केल्यास
सदरील वाहन हे लिलावाच्या यादीतुन वगळण्यात येईल. सदर वाहन लिलावात भाग घेतांना
प्रसिध्दी केलेल्या उदघोषणाचे व उदघोषणा मधील अटी शर्तीचे पुर्णपणे अवलोकन करुनच
वाहन लिलावामध्ये भाग घ्यावा, वाहन लिलावात भाग घेतांना कोव्हिड -19 बाबत वेळोवेळी
दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन होईल याची दक्षता घ्यावी, तसेच वाहन
लिलावामध्ये भाग घेतांना वरील सर्व अटी शर्तीचे पालन करुनच भाग घ्यावा व सदर
लिलावाच्या कामकाजात गदरोळ निर्माण केल्यास संबंधिताचा अर्ज बाद करण्यात येवुन
अनामत रक्कम जप्त करण्यात येईल तसेच शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केलेबाबत
संबंधिताविरुध्द फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येईल, याची सर्वानी नोंद
घ्यावी, असे तहसिलदार नामदेव पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या एका पत्रकान्वये कळविले
आहे.
००००
No comments:
Post a Comment