Wednesday, 16 February 2022

राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा विविध स्पर्धेचे आयोजन १५ मार्च पर्यंत सविस्तर माहिती संकेतस्थळावर उपलब्ध

      जळगाव, दि.१६ (जिमाका वृत्तसेवा) : भारत निवडणूक आयोगाने राष्ट्रीय मतदार दिना पासून 15 मार्च, 2022 पर्यंत माझे मत माझे भविष्य- एका मताचे सामर्थ्य ही राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा आयोजित केली आहे. याव्दारे जनतेच्या प्रतिभा आणि सर्जनशीलतेचा वापर लोकशाही बळकटीकरणासाठी करण्यात येत आहे. माझे मत माझे भविष्य- एका मताचे सामर्थ्य या मध्यवर्ती संकल्पनेवर राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत प्रश्नमंजुषा स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, व्हिडीओ मेकिंग स्पर्धा आणि पोस्टर डिझाईन स्पर्धांचा समावेश आहे.

 या स्पर्धेविषयी सविस्तर माहिती  https://ecisveep.nic.in/contest/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच स्पर्धकांनी प्रवेशिका सर्व तपशिलांसह  yoter-contest@eci.gov.in या ईमेलवर 15 मार्च, 2022 पर्यंत पाठवाव्यात ई –मेल करतांना स्पर्धेचे नाव आणि श्रेणी याचा विषयात उल्लेख करावा.

 तरी जळगाव जिल्हयातील सर्व नागरिकांनी राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा  अंतर्गत विविध स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, जळगाव यांचे मार्फत एका प्रसिध्दी पत्रकान्वये करण्यात येत आहे.

००००

No comments:

Post a Comment