जळगाव, दि. 3 (जिमाका वृत्तसेवा) :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2022 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचा अंदाजित कार्यक्रम निश्चित करण्यात आला असून त्याची प्रत आपल्या माहितीसाठी सोबत पाठविण्यात येत आहे.
प्रस्तुत वेळापत्रक अंदाजित असल्याने शासनाकडून
पदभरतीकरीता विहित कालावधीत परिपूर्ण मागणीपत्र प्राप्त झाल्यास जाहिरात प्रसिध्द
करणे शक्य होईल, शासनाकडून प्राप्त झालेल्या मागणीपत्राच्या आधारे जाहिरात
प्रसिध्द झाल्यानंतरच परीक्षेच्या आयोजनाबाबत प्रत्येक प्रकरणी वेळोवेळी आपणास
कळविण्यात येईल
संबंधित
पदभरतीस अनुसरुन आयोजित करावयाच्या परीक्षेसाठी प्राथमिक अंदाजानुसार आपल्या जिल्हाकेंद्रावर
प्रवेश देण्यात येणाऱ्या उमेदवारांची संख्या जाहिरातीनंतर लगेचच कळविण्यात येईल,
संबंधित परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची संख्या अर्ज स्वीकारण्याच्या
अंतिम दिनांकानंतरच निश्चित होत असल्याने त्याप्रमाणे अंतिम संख्या कळविण्यात
येईल.
सन
– 2022 मधील स्पर्धा परीक्षांचा अंदाजित कार्यक्रम विचारात घेऊन आयोगाच्या अथवा
संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागणीनुसार वेळोवेळी शाळा / महाविद्यालये
उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करणेबाबत आयुक्त / संचालक ,शिक्षण / उच्च शिक्षण /
तंत्र शिक्षण/ व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण यांना स्वतंत्रपणे कळविण्यात येत आहे.
आयोगामार्फत आयोजित परीक्षा लोकसेवेसाठी आयोजित केल्या जातात त्यामुळे
परीक्षांच्या आयोजनासाठी वेळोवेळी व आवश्यकतेनुसार संबंधित कायद्यातील तरतुदींचा
वापर करुन संबंधित शाळा / महाविद्यालये यांचे अधिग्रहण करण्याबाबतही कृपया विचार
व्हावा, प्रस्तावित कार्यक्रम फक्त
स्पर्धा परीक्षा व मर्यादित विभागीय परीक्षांसाठीच आहे. सरळसेवा भरतीकरिता
आयोगामार्फत विज्ञापित जाहिरातीस अनुसरुन एखादया प्रकरणी चाळणी परीक्षा घेण्याचे
निश्चित झाल्यास त्यानुसार आपणास कळविण्यात येईल.
प्रस्तुत वेळापत्रक जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या सूचना फलकावर कृपया प्रसिध्द करण्यात आले आहे, आयोगामार्फत आयोजित
परीक्षांकरीता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अविरतपणे प्राप्त होणाऱ्या
सहकार्याबद्दल आयोगाच्या वतीने सर्व संबंधिताचे आभार मानले आहे असे महाराष्ट्र लोकसेवा
आयोग सह सचिव सुनिल अवताडे यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
००००
No comments:
Post a Comment