Thursday, 17 February 2022

महिला उद्योजकांना नेक्सस इनक्युबेशन प्रोग्राम मध्ये सहभागी होण्याची संधी

         जळगाव, दि.17 (जिमाका वृत्तसेवा) – कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागांतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचा महिला उद्योजकता कक्ष, युनायटेड स्टेटस ऑफ अमेरिका यांचा दुतावास, मुंबई तसेच स्टार्टअप नेक्सस व  Alliace for Commercialization and Innovation Research  (ACIR)  यांचे संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र महिला आर्थिक सक्षमीकरण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. महाराष्ट्रातील 36 जिल्हयातील प्रारंभिक टप्प्यातील आघाडीवर असलेल्या उपक्रमांमधील उद्योजक महिलांची उद्योजकीय व व्यवस्थापकीय कौशल्ये वाढविणे, महिलांना उद्योजकीय कौशल्ये, प्रशिक्षण तसेच कार्यक्रमाच्या अंती एकमेकांच्या सहाय्यासाठी स्थानिक महिलांची साखळी तयार करणे व महिला उद्योजकांच्या स्टार्टअपचे शाश्वत व्यवसायिक उपक्रमांमध्ये रुपांतरण करणे असा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

                पात्रता निकष

                फक्त महिला उद्योजक अर्ज करण्यास पात्र, अर्जदार ही नाविन्यपुर्ण उपक्रम/स्टाटअपची संस्थापक किंवा सहसंस्थापक असावी, अर्जदाराचे वय 18 पेक्षा जास्त असावे, सहभाग घेण्याऱ्यास इंग्रजीचे ज्ञान असणे आवश्यक आहे कारण सर्व मार्गदर्शन व प्रशिक्षण वर्ग हे इंग्रजीमध्ये असतील, अर्जदार भारतीय नागरिक आणि महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

          लाभ

                संपुर्णपणे महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीव्दारे पुरस्कृत, पहिल्या 6 अंतिम स्पर्धकांना आघाडीच्या नेक्सस इनक्युबेशन प्रोग्राम मध्ये सहभागी होण्याची संधी, मजबुत स्थानिक उद्योजकांचे जाळे उभारण्यास मदत, अग्रगण्य महिला उद्योजकांकडुन मार्गदर्शन, उद्योजक महिलांचे सहकार्य.           

                                                          0000

No comments:

Post a Comment