Wednesday, 23 February 2022

संत गाडगे बाबा महाराज जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिमापूजन

 




       जळगाव, दि.23 (जिमाका वृत्तसेवा)संत गाडगे बाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिमापूजन करुन संत गाडगे बाबानां अभिवादन करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांच्या हस्ते प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.

            यावेळी, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी  तुकाराम हुलवळे, तहसीलदार सुरेश थोरात,  नायब तहसीलदार अमित भोईटे विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

०००००


No comments:

Post a Comment