Tuesday, 1 February 2022

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजना सन 2021 -22 शेतकरी बांधवांनी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर पर्याय निवडून अर्ज सादर करावा

                     जळगाव, दि. 1 (जिमाका वृत्तसेवा) :- जळगाव जिल्हयातील सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजना सन 2021 -22 अंतर्गत जिल्हयास वार्षिक कृती आराखडा मंजुर झाला असून सदर योजनेतर्गत खाली नमुद केलेल्या घटकांकरीता शेतकऱ्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

                                घटक  -  डाळिंबी उत्पादन केंद्र –  अधिकतम अनुदान मर्यादा - रु. 8.00 लाख,  जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन (आंबा पिकासाठी) – रु. 0.20 लाख, सामुहिक शेततळे – 24x24x4  मी. आकरमानासाठी रु. 1.75 लाख, 34x34x4.7 मी. आकारमानासाठी रु. 3.39 लाख, , शेततळे अस्तरीकरण – जास्तीत जास्त रु. 0.75 लाख, संरक्षित शेती अंतर्गत हरितगृह व शेडनेटगृह – मॉडेलनिहाय मंजुर खर्च मापदंडानुसार किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के ( जे कमी असेल ते), प्लॉस्टिक मल्चिंग –रु. 0.16 लाख ( जास्तीत जास्त 2.00 हेक्टर पर्यत), ट्रॅक्टर 20 अश्वशक्तीपर्यत – सर्वसाधारण प्रवर्गातील महाभुधारक लाभार्थ्यासाठी रु. 0.75 लाख व सर्वसाधारण प्रवर्गातील अल्पभुधारक, अनु. जाती , अनु. जमाती, महिला शेतकरी यांना रु. 1.00 लाख

                                शितखोली – ग्राहय भांडवली खर्चाच्या 35 टक्के रु. 5.25 लाख, प्राथमिक प्रक्रिया केंद्र  ग्राहय भांडवली खर्चाच्या 40 टक्के रु. 10.00 लाख, कांदाचाळ उभारणी – ग्राह्य भांडवली खर्चाच्या 50 टक्के रु. 0.875 लाख, मधुमक्षिका वसाहत व संच वाटप - ग्राह्य भांडवली खर्चाच्या 40 टक्के रु. 0.40 लाख,  स्थाई / फिरते / विक्री केंद्र शित चेंबरच्या सुविधेसह - ग्राह्य भांडवली खर्चाच्या 50 टक्के रु. 0.15 लाख, पॅक हाऊस - ग्राह्य भांडवली खर्चाच्या 50 टक्के रु. 2.00 लाख,  ड्रॅगन फ्रुट, अंजीर, स्ट्रॉबेरी, किवी लागवड – प्रति हेक्टर रु. 1.60 लाख, भाजीपाला रोपवाटीका  - ग्राह्य भांडवली खर्चाच्या 50 टक्के रु. 2.30 लाख,

                   शेतकरी बांधवांना उपरोक्त घटकांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलचे  https://mahadbtmahait.gov.in  या संकेतस्थळावर शेतकरी योजना या पर्याय निवडून अर्ज सादर करावा, सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बंधुनी आपला वैयक्तिक मोबाईल क्रमांक आपल्या आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक राहील. पोर्टलवर प्राप्त अर्जाची ऑनलाईन लॉटरी, पूर्वसंमती देणे, मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे, इत्यादी प्रक्रिया ऑनलाईन होणार असल्याने या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टलवर त्वरीत अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांचेकडून करण्यात येत आहे. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

००००

 

No comments:

Post a Comment