Wednesday, 2 February 2022

पालकमंत्री गुलाबराव पाटील आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

           जळगाव, दि.2 (जिमाका वृत्तसेवा) : जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील गुरुवार ३ फेब्रुवारी  २०२२ रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

                पालकमंत्री श्री. पाटील यांचा दौरा असा : गुरुवार दि. ३ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ६.१८ वाजता  अमृतसर एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन, सकाळी ६.२० वाजता जळगाव रेल्वे स्टेशन येथून शासकीय वाहनाने पाळधी ता. धरणगाव  कडे प्रयाण,  सकाळी ७.०० वाजता पाळधी ता. धरणगाव  येथे आगमन व राखीव, सकाळी १०.०० वाजता पाळधी येथून कूरवेल ता. चोपडा कडे प्रयाण, सकाळी १०.४५ वाजता कूरवेल येथे गोरखतात्या, माजी अध्यक्ष जिल्हा परिषद, जळगाव यांच्याकडे साक्षगंध कार्यक्रमास उपस्थिती, सोईनुसार कुरवेल येथून पाळधी ता. धरणगाव कडे प्रयाण व राखीव, सायं ६.०० वाजता पाळधी येथून धरणगाव कडे प्रयाण, सायं. ७ वाजता धरणगाव येथे विविध विकासकामांच्या उदघाटनास उपस्थिती, सोईनुसार पाळधीकडे प्रयाण व राखीव.

०००००

No comments:

Post a Comment