Friday, 11 February 2022

पालकमंत्री गुलाबराव पाटील आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

           जळगाव, दि.११ (जिमाका वृत्तसेवा) : जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील शनिवार १२ फेब्रुवारी, २०२२ रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

                पालकमंत्री श्री. पाटील यांचा दौरा असा : शनिवार १२ फेब्रुवारी,२०२२ रोजी सकाळी ९.०० वाजता पाळधी येथे  अभ्यांगत व कार्यकर्त्यांच्या भेटी व चर्चा,  सकाळी १०.०० वाजता पाळधी ता. धरणगाव येथून शासकीय वाहनाने भुसावळ कडे प्रयाण, सकाळी ११.०० वाजता भुसावळ येथे आगमन व विविध विकास कार्यक्रमांच्या उदघाटनास उपस्थिती, सोयीनुसार पाळधी ता. धरणगाव कडे शासकीय वाहनाने प्रयाण व राखीव, दुपारी ४.३० वाजता पाळधी ता. धरणगाव येथुन शासकीय वाहनाने धरणगांव तालुक्यातील विविध गावांना भेटी व विकास कामांचे उदघाटनास उपस्थिती. सोईनुसार पाळधी ता. धरणगाव कडे  शासकीय वाहनाने प्रयण व राखीव.

०००००

 

No comments:

Post a Comment